QuoteUnion Government aims to develop eastern India as the gateway to South-East Asia: PM Modi
QuoteIIT Bhubaneswar would spur the industrial development of Odisha and work towards improving the lives of the people: PM
QuoteCentral Government is devoted towards ensuring all-round development of Odisha: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या ओदिशा दौऱ्यावर गेले होते.

|

आयआयटी भुवनेश्वर परिसरात पंतप्रधानांच्या हस्ते ‘पैका’ या ओदिशी क्रांतीकारकाच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्यात आले. 1817 साली ‘पैका’ यांनी ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र क्रांती केली होती, जी इतिहासात पैका विद्रोह या नावाने ओळखली जाते.

|

यावेळी भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठात ‘पैका’ यांच्या नावाने एक अध्यासन सुरु करण्याची घोषणाही करण्यात आली.

|

पंतप्रधानांच्या हस्ते ‘ललितगिरी’ या वास्तुसंग्रहालयाचेही उद्‌घाटन झाले. ओदिशामधील ललितगिरी हे बौद्ध धर्माचे एक सुप्रसिद्ध सांस्कृतिक स्थान आहे. या जागेला पुरातत्वीय महत्वही असून येथे प्राचीन स्तूप आणि बुद्ध विहार आहे.

यावेळी पंतप्रधानांनी आयआयटी भुवनेश्वरचा नवा परिसर राष्ट्राला अर्पण केला तसेच कामगारांसाठीच्या इसीआयएस रुग्णालयाचे उद्‌घाटनही त्यांच्या हस्ते झाले. त्याशिवाय जलवाहिनी आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली.

|

यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, आज उद्‌घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झालेल्या प्रकल्पांची एकूण किंमत 14 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. पूर्व भारताचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

|

आयआयटी भुवनेश्वरमुळे ओदिशाच्या औद्योगिक विकासाचा मार्ग खुला होईल तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राज्यात आरोग्य सुविधा, रस्ते, तेल आणि घरगुती गॅस पाईपलाईन सुरु करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

Click here to read full text speech

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India's enemies saw what happens when Sindoor turns into 'barood': PM Modi's strong message to Pakistan

Media Coverage

India's enemies saw what happens when Sindoor turns into 'barood': PM Modi's strong message to Pakistan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM attends the Defence Investiture Ceremony-2025 (Phase-1)
May 22, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi attended the Defence Investiture Ceremony-2025 (Phase-1) in Rashtrapati Bhavan, New Delhi today, where Gallantry Awards were presented.

He wrote in a post on X:

“Attended the Defence Investiture Ceremony-2025 (Phase-1), where Gallantry Awards were presented. India will always be grateful to our armed forces for their valour and commitment to safeguarding our nation.”