पंतप्रधानांचा लेह, लडाख दौरा

Published By : Admin | February 3, 2019 | 10:15 IST
Our government’s mantra is ‘Sabka Saath, Sabka Vikas’: Prime Minister Modi
Central Government is committed to connecting every citizen of the country with the mainstream of development: PM Modi
No stone will be left unturned for development of Leh, Ladakh and Kargil: PM Modi

लेह, जम्मू आणि श्रीनगरच्या एक दिवसाच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन/पायाभरणी केली.

कडाक्याच्या थंडीत मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या लोकांचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, ‘जे लोक कठीण परिस्थितीमध्ये राहतात ते प्रत्येक संकटाला आव्हान देतात. तुमच्या प्रेमामधून मला कठोर परिश्रम करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते’

पंतप्रधानांनी लडाख विद्यापीठाचे उद्‌घाटन केले. ते म्हणाले ‘युवा विद्यार्थी लडाखच्या लोकसंख्येचा 40 टक्के भाग आहे. या भागात विद्यापीठ व्हावे ही मागणी अनेक वर्ष प्रलंबित होती. लडाख विद्यापीठाच्या उद्‌घाटनामुळे ही मागणी पूर्ण झाली आहे.’ लेह, कारगील, नुब्रा, झंस्कार, द्रास, खाल्टसी इथल्या पदवी महाविद्यालयाचा या विद्यापीठात समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लेह आणि कारगीरमध्ये विद्यापीठाची प्रशासकीय कार्यालये असतील.

दातांग गावाजवळच्या दाह येथील 9 मेगावॅट दाह जलविद्युत प्रकल्प आणि 220 केव्ही, श्रीनगर-अलुस्टेंग-द्रास-कारगिल-लेह-पारेषण प्रणालीचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या प्रकल्पांचे उद्‌घाटन करतांना पंतप्रधान म्हणाले ‘आम्ही विलंबाची संस्कृती मागे ठेवली आहे’ ज्या ज्या प्रकल्पांची पायाभरणी आपण केली त्या प्रकल्पांचे उद्‌घाटनही आपल्याच हस्ते होईल, याची दक्षता सरकार घेईल असे ते म्हणाले.

लडाखमधील 5 नवीन पर्यटक आणि ट्रेकिंग मार्ग आज खुले करण्यात आले. जेव्हा एखादे शहर संपर्क व्यवस्थेशी जोडले जाते तेव्हा आर्थिकदृष्ट्याही जीवन सुखकर होते. बिलासपूर-मनाली-लेह रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते लेह हे अंतरही कमी होईल, असे ते म्हणाले.

लेहमधील कुशोक बकुला रिंपोची (केबीआर) विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.

या नवीन टर्मिनलमुळे सर्व आधुनिक सुविधांसह प्रवाशांची जलद वाहतूक होऊ शकते. या सर्व प्रकल्पांमुळे या भागात विजेची उत्तम उपलब्धता, सुधारित संपर्क व्यवस्था उपलब्ध होईल आणि यामुळे या भागात पर्यटकांचा ओघ वाढेल. तसेच अनेक गावांना उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय संरक्षित क्षेत्र परवान्याची वैधता 15 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता पर्यटक लेहमध्ये अधिक काळ थांबून प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.

एलएएचडीसी कायद्यात काही बदल करण्यात आले असून परिषदेला खर्च करण्यासंबंधी जास्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. आता स्वायत्त परिषद या भागाच्या विकासासाठी निधी जारी करू शकेल, असे ते म्हणाले.

अंतरिम अर्थसंकल्पाबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, अनुसूचित जातीच्या कल्याणासाठीच्या तरतुदीत 35 टक्के तर अनुसूचित जमातींसाठी 30 टक्के वाढ करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi