पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियानचे अध्यक्ष आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सेईन लूंग यांच्या लेखाची प्रशंसा केली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘‘ आसियानचे अध्यक्ष, सिंगापूरचे पंतप्रधान ली सेईन लूंग यांनी एक उत्कृष्ट लेख लिहिला आहे. प्रस्तूत लेखामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भारत-आसियान संबंधाविषयीचा समृद्ध इतिहास सांगितला आहे. त्याचबरोबर भारत-आसियान यांच्यातील मजबूत सहकार्य आणि आशादायी भविष्य कसे आहे, याचा मागोवा घेतला आहे.
भारत- आसियान शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी सिंगापूरचे पंतप्रधान ली सेईंग लूंग सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आजच्या ‘द टाइम्स आॅफ इंडिया’ या इंग्रजी वर्तमानपत्राच्या संपादकीय पृष्ठावर ‘‘ रिव्हाइव ए मिलेनिल पार्टनरशिप: सिंगापूर हॅज प्लेड ए मेजर रोल इन इंडियाज् क्लोजर इंटिग्रेशन विथ आसियान‘‘ या शीर्षकाचा लेख लिहिला आहे. भारत आणि आसियान यांच्या दरम्यान खूप प्राचीन काळापासून व्यापारी, वाणिज्यिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत त्यामुळे एकमेकांमध्ये असलेले नाते अधिक दृढ बनण्यासाठी या संबंधांनीच एक महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
पंतप्रधान लूंग यांनी या लेखामध्ये पुढे म्हटले आहे की, भारताने आसियान समूहामध्ये सहभागी व्हावे, असे सिंगापूरला नेहमीच वाटले आहे. भारत 1992 मध्ये आसियान क्षेत्रीय संवादी भागीदार बनला. त्यानंतर 1995 मध्ये भारत पूर्णकालीन संवादी भागीदार बनला आणि 2005 मध्ये पूर्व अशिया संमेलनामध्ये भारत ( ईएएस )सहभागी झाला. ईएएस ही एक मुक्त आणि सर्वसमावेशक त्याचबरोबर मजबूत क्षेत्रीय संरचना आहे. क्षेत्रीय दृष्ट्या रणनीती आखून नेतृत्व करणारे ते महत्वपूर्ण व्यासपीठ आहे.
आसियान- भारत संबंधांचे 2012मध्ये 20वे वर्धापनवर्ष होते. यावर्षी रणनीती बदलून त्याला सामंजस्याचे स्वरूप आले. आज आसियान आणि भारत, आसियानचे राजनीतिक- सुरक्षा आणि आर्थिक तसेच सामाजिक, सांस्कृतिक स्तंभांचा अनेक मार्गांनी सहयोग, सहकार्य यांचा लाभ घेत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अॅक्ट ईस्ट’ या कार्यक्रमामुळे आणि आसियानबरोबर मजबूत संबंध प्रस्थापित करण्यासाठी ‘तीन -सी’( कॉमर्स-वाणिज्य, कनेक्टिव्हिटी- संपर्क यंत्रणा, कल्चर -संस्कृती) आमच्या दृष्टीने व्यापक सहयोगाचे सर्वोत्तम उदाहरण आहेत, असे म्हणता येईल. आमच्याकडे एक वार्षिक शिखर परिषद आणि सात मंत्रिस्तरीय वार्ता कार्यक्रम, बैठका, सभा यांच्यासह जवळपास 30 व्यासपीठ उपलब्ध आहेत. भारताने अतिशय सक्रियतेने आसियान क्षेत्रीय व्यासपीठ, आसियान सरंक्षण मंत्री बैठक आणि पूर्व अशिया शिखर संमेलनासह आसियानच्या नेतृत्व करणाऱ्या व्यासपीठांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
व्यापार आणि वाणिज्य याविषयी लूंग यांनी नमूद केले आहे की, आसियान-भारत मुक्त व्यापार क्षेत्र (एआयएफटीए) याबरोबरच आसियान -भारत व्यापार 1993 मध्ये 2.9 अब्ज डाॅलरच्या तुलनेमध्ये अतिशय उल्लेखनीय स्वरूपात वृद्धी झाली आहे. हा व्यापार 2016 मध्ये 58.4 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. सामाजिक, सांस्कृतिक आघाडीवर आसियान -भारत विद्यार्थी विनिमय कार्यक्रम आणि वार्षिक दिल्ली संवाद यासारखे कार्यक्रम, लोकांमध्ये आपसातले संबंध अधिक मजबूत करण्यासाठी खूप चांगली भूमिका बजावत आहेत. या व्यासपीठांच्या माध्यमातून आमचे युवक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, उद्योग व्यावसायिक आपआपसांत भेटतात. आणि एकमेकांकडून बरेच काही शिकतात यामुळे संबंध अधिक मजबूत बनत आहेत.
आसियन- भारत संबंधांच्या रौप्य महोत्सवानिमित्त दोन्ही बाजूंनी बऱ्याच स्मरणात राहतील असे कार्यक्रम आखले आहेत. अलिकडेच सिंगापूर येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाच्या आयोजनातून भारतीय समुदायाचा सहभाग दिसून आला. आजची आसियन भारत स्मृती परिषद ही यावर आधारित असून नवी दिल्लीतील आशियन नेत्यांसाठी हा आदराचा भाग आहे. 69 व्या प्रजासत्ताक दिनाच्या उद्याच्या संचलनामध्ये आशियन नेत्यांना मुख्य पाहुणे म्हणून आदराने आमंत्रित केले आहे.
सिंगापूरच्या पंतप्रधानांनी मोठा जागतिक कल आकार घेत असून धोरणात्मक आणि आव्हानात्मक समस्यांबाबत लिहिले. धोरणात्मक पावित्र्यात होत असलेला बदल संस्कृती, राजकीय बदल, जनसांखिकी हे सर्व मुद्दे जगाच्या काही भागांमध्ये विचाराधीन आहेत. जागतिकीकरणावरील समस्या आणि मुक्त व्यापार हे अजूनही वादातीत असले तरीही अशियन गाथा ही निरंतरपणे सकारात्मक आहे. आपल्याला आर्थिक एकात्मकतेला पुष्ठी देण्याची गरज आहे. तसेच सीमेवरील आव्हाने, दहशतवाद, सायबर क्राईम आणि वातावरण बदल यांचाही यामध्ये अंतरभाव असून याप्रश्नांवर तोडगा काढणे आवश्यक आहे.
भूराजकीय अशांततेमुळे भारतासारख्या आशियनच्या सहकार्य भागीदाराला नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागते. जेव्हा की भारत-आशियन यांचे शांतता आणि सुरक्षा हे दोन्ही एकत्रित रुची असलेले मुद्दे आहेत. भारतीय पॅसिफिक महासागराच्या समुद्रीय कक्षांद्वारे भारताने व्यापारी मार्ग आशियन सदस्यांच्या राष्ट्रांना उपलब्ध करून दिले आहेत. दोन्ही बाजूंचे हे सम रुची असलेले समुद्रीय व्यापारिक धोरण जपणे आवश्यक आहे.
ली. हेसिन लूंग यांनी जागतिक लोकसंख्येच्या ¼ भागाच्या तुलनेत भारत-आशियनची एकत्रित 1.8 बिलियन लोकसंख्या जगाचे प्रतिनिधीत्व करते, असे सांगितले. एकत्रित सकल वृद्धी दर 4.5 ट्रीलियन अमेरिकन डॉलरने वाढले. वर्ष 2025 पर्यंत भारताची ग्राहक बाजारपेठ ही जागतिक पातळीवरील भारताची सर्वाधिक मोठी बाजारपेठ असेल तर साऊथ इस्ट आशियातील मध्यमवर्गीयांची संख्या 163 दशलक्ष अशी दुप्पट होईल. दोन्ही विभाग राजकीय लाभांश घेत असून आसियनच्या लोकसंख्येमध्ये 35 वर्ष वयाचे 60 टक्के लोक आहेत तर भारतामध्ये वर्ष 2020 पर्यंत सरासरी वय 29 वर्षे राहील जी जागतिक पातळीवर सगळ्यात तरुण पिढी राहील. त्यांनी स्मार्ट सिटी नेटवर्क, समुद्रीय संलग्नता, डिजिटल संलग्नता आणि आर्थिक विषयांच्या अनेक महत्त्वाच्या बाबींवर दोन्ही बाजूंचे संबंध भरभक्कम असण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला.
A wonderful article by @ASEAN Chair Singapore’s PM, Mr. @leehsienloong. It beautifully covers the rich history, robust cooperation and promising future of India-ASEAN relations. https://t.co/FPGfI1eLbj
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2018