ज्येष्ठ हिंदी कवी केदारनाथ सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“केदारनाथ सिंग यांच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख झालं आहे. त्यांच्या कवितेतून त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या भावना व्यक्त केल्यात. साहित्य जगतात आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांचे साहित्य कायमच प्रेरणा देत राहिल.” असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.
केदारनाथ सिंग यांना २०१३ साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. “अभी बिलकूल अभी”, “जमीन पक रही है” आणि “अकाल में सरस” अशी त्यांची काव्यसंपदा खूप गाजली.
हिन्दी के महान कवि-साहित्यकार केदारनाथ सिंह जी के निधन से गहरा दुख हुआ है। उन्होंने लोकजीवन की संवेदनाओं को अपनी कविताओं में जगह दी। साहित्य जगत और सामान्य जन दोनों को हमेशा उनसे प्रेरणा मिलती रहेगी। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति दे और परिवार को इस दुखद घड़ी में संबल प्रदान करे: PM
— PMO India (@PMOIndia) March 20, 2018