भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त, 2022 पर्यंत आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकजुटीने, टीम इंडिया या संघभावनेने काम करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या तिसऱ्या बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 2022 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचे लक्ष्य ठेवून ते साध्य करण्यासाठी राज्य सरकारे, स्थानिक प्रशासन, शासकीय आणि बिगर शासकीय संघटनांनी मिशन मोडवर अर्थात जोमाने काम करावे असे त्यांनी सांगितले.
आजच्या बैठकीत भरीव आणि ठोस चर्चा झाल्याचे सांगून, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊनच व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुदयाला अंतिम रुप दिले जाणार आहे. सुप्रशासनावर पंतप्रधानांनी भर दिला, यामुळे साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर होतो असे स्पष्ट केले.
वस्तू आणि सेवा करासाठी राज्य स्तरावरच्या वैधानिक व्यवस्थेला उशीर लावता कामा नये याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
शासकीय खरेदीतली पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी ई-बाजाराचा उपयोग करावा असे सुचवताना, भीम आणि आधारसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे राज्यांची बचत होईल असे ते म्हणाले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकाच वेळी घेण्याच्या विषयावर ठोस चर्चेला सुरुवात झाल्याचे त्यांनी नमूद केले. वित्तीय वर्ष जानेवारी ते डिसेंबर असावे अशा आशयाच्या सूचना मांडण्यात आल्या असून राज्यांनी या संदर्भात पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी राज्यांना केले.
PM @narendramodi is chairing the 3rd Governing Council Meet of the @NITIAayog in New Delhi. pic.twitter.com/ynYWTiIwzc
— PMO India (@PMOIndia) April 23, 2017
Cabinet Ministers, State CMs, officials, members of @NITIAayog & special invitees are attending the @NITIAayog Governing Council meeting. pic.twitter.com/tMw2lxhiRC
— PMO India (@PMOIndia) April 23, 2017
Click here to read Presentations on NITI Aayog’s work
Click here to read closing remarks at 3rd Meeting of Governing Council of NITI Aayog