पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएनएस कलवरी या नौदलाच्या पाणबुडीचे मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रार्पण केले. यावेळी देशातल्या जनतेने अभिनंदन करतानाच आयएनएस कलवरी म्हणजे “मेक इन इंडिया”चे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी या पाणबुडीच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या सर्वांची प्रशंसा केली ही “पाणबुडी” म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यातल्या वेगाने वाढणाऱ्या धोरणात्मक भागिदारीचे उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आयएनएस कलवरीमुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी भर पडणार असल्याचे ते म्हणाले.

|

21 वे शतक हे आशियाचे शतक असे म्हटले जाते. 21 व्या शतकात, विकासाचा मार्ग हिंदी महासागराद्वारेच जाईल हे निश्चित. त्यामुळेच सरकारच्या धोरणात हिंदी महासागराला विशेष स्थान असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

सिक्युरीटी ॲंड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, SAGAR अर्थात प्रदेशातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास याद्वारे हा दृष्टिकोन समजून घेता येईल असेही ते म्हणाले.

हिंदी महासागरात, जागतिक धोरणात्मक आणि आर्थिक हिताबाबत भारत पूर्णत: जागरुक असून त्यामुळेच आधुनिक आणि बहुआयामी भारतीय नौदल, या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

|

सागराच्या अंगभूत क्षमतेमुळे आपल्या राष्ट्राच्या विकासाला आर्थिक ताकदीची जोड मिळाल्याचे सांगून त्यामुळेच समुद्राशी संबंधित दहशतवाद, तस्करी, अंमली पदार्थांची वाहतूक या केवळ भारताला भेडसावणाऱ्या नव्हे अंमली पदार्थांची वाहतूक या केवळ भारताला भेडसावणाऱ्या नव्हे तर इतर राष्ट्रांनाही सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांविषयी भारताला जाणीव आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

“वसुधैव कुटुंबकम्‌” अर्थात संपूर्ण जग हे एक कुटुंबच आहे अशी भारताची धारणा असून त्याला अनुसरुनच भारत आपल्या जागतिक जबादाऱ्या निभावत आहे. आपल्या सहकारी राष्ट्रांना, संकटाच्या काळात पहिल्यांदा मदतीचा हात देण्यात भारत तत्पर आहे. भारतीय राजनैतिक आणि सुरक्षा आस्थापनातला मानवी चेहरा हे आपले वैशिष्टय आहे. सामर्थ्यवान भारत मानवतेसाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. शांतता आणि स्थैर्याच्या मार्गावर भारताच्या बरोबरीने वाटचाल करायची जगातल्या इतर देशांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षात संरक्षणविषयक संपूर्ण परिसंस्थेत बदल व्हायला सुरुवात झाली आहे. वन रँक वन पेन्शन अर्थात “एक श्रेणी एक समान निवृत्तीवेतन” या दीर्घकाळ प्रलंबित मुद्दयाचे निराकरण करुन सरकारने आपली कटिबध्दता दर्शवली आहे. सरकारची धोरणे आणि सैन्यदलांचे शौर्य यामुळे जम्मु-काश्मिरमध्ये छुपे युध्द म्हणून दहशतवादाचा वापर करण्याची चाल अयशस्वी ठरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांप्रती पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.

|

आधुनिक काळात युध्द नीतीमध्ये, विनाशी, शक्तीशाली आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पाणबुडया आपल्या राष्ट्राच्या शांततेसाठी आणि जरब ठेवण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. जागतिक शांततेच्या दृष्टिकोनातून आयएनएस कलवरीचे महत्व असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी बोलताना सांगितले.
भारतीय नौदल आणि फ्रान्सच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट 75 अंतर्गंत आयएनएस कलवरी मुंबईतल्या माझगाव बंदरात बांधण्यात आली आहे. फ्रान्सचे नौदल संरक्षण आणि ऊर्जा कंपनी डीसीएनएस यांनी या पाणबुडीचे आरेखन केले आहे. स्कॉर्पेन वर्गातल्या भारतीय नौदलात समाविष्ट होणाऱ्या सहा पाणबुडयांपैकी ही पहिली पाणबुडी आहे. हिंदी महासागरात आढळणाऱ्या विक्राळ शार्कच्या नावावरुन कलवरी हे नाव देण्यात आले आहे.

नौदलात समाविष्ट करण्याच्या या कार्यक्रमात कमिशनिंग वॉरंटचे वाचन आणि राष्ट्रगीतही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएस कलवरीच्या फलकाचे अनावरण केले.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनिल लांबा आणि नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Click Here to read full text speech

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
I-T refunds up 6x in 11 years at ₹4.8L crore

Media Coverage

I-T refunds up 6x in 11 years at ₹4.8L crore
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 जुलै 2025
July 13, 2025

From Spiritual Revival to Tech Independence India’s Transformation Under PM Modi