पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मैसूर आणि केएसआर बेंगळूरु दरम्यानच्या रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे राष्ट्रार्पण केले. मैसूर रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी मैसूर आणि उदयपूर दरम्यानच्या पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
या आधी पंतप्रधानांनी श्रवणबेळगोळ येथे बाहूबली महामस्तकाभिषेक महोत्सव 2018 ला भेट दिली. विंद्यगिरी पर्वतावर बांधण्यात आलेल्या पायऱ्यांच्या नव्या मार्गाचे त्यांनी उद्घाटन केले. बाहुबली रुग्णालयाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
आपल्या भूमीतल्या संतांनी सदैव समाजाची सेवा केली आणि सकारात्मक बदल घडवला असे पंतप्रधानांनी श्रवणबेळगोळ येथे जनतेला संबोधित करताना सांगितले. काळाच्या प्रमाणे आपण बदल घडवत गेलो ही आपल्या समाजाची ताकद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गरीबांसाठी दर्जेदार आणि माफक दरातली आरोग्य सेवा पुरवणे हे आपले कर्तव्य असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.