पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय नौदलाचे खलाशी जहाज तारिणीच्या अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल केला. आयएनएसव्ही तारिणी सध्या पृथ्वी प्रदक्षिणेवर आहे.
देशाच्या वतीने पंतप्रधानांनी आयएनएसव्ही तारिणीच्या सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच मोहीम यशस्वी व्हावी, यासाठीही शुभेच्छा दिल्या.
आयएनएसव्ही तारिणी 22,100 नॉटिकल मैलांची पृथ्वी प्रदक्षिणेला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आयएनएसव्ही तारिणीच्या अधिकाऱ्यांना भेट दिली होती.
सध्या ऑस्ट्रेलियातील फ्रेमॅन्टल या आपल्या पहिल्या थांब्याकडे ते मार्गस्थ होत आहे. 4,770 नॉटिक ल मैलांचा पहिला टप्पा पार केल्यानंतर 22 ऑक्टोबर 2017 ला ते तिथे पोहोचणे अपेक्षित आहे.
खलाशांमधील लेफ्टनंट कॅडर वर्तिका जोशी आणि लेफ्टनंट पायल गुप्ता या सदस्यांना पंतप्रधानांनी वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छाही दिल्या.