भारतीय रिझर्व बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2023 मध्ये "A+" दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. A+ मानांकन मिळालेल्या तीन मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या यादीत, दास यांना शीर्षस्थान देण्यात आले आहे.
भारतीय रिझर्व बँकेच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
"आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे अभिनंदन. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे, जो जागतिक स्तरावरील आपले आर्थिक नेतृत्व प्रतिबिंबीत करतो. त्यांचे समर्पण आणि दूरदृष्टी आपल्या देशाच्या विकास प्रक्रियेला बळ देत आहे.”
Congratulations to RBI Governor Shri Shaktikanta Das. This is a proud moment for India, reflecting our financial leadership on the global stage. His dedication and vision continue to strengthen our nation's growth trajectory. https://t.co/MtdmI8La1T
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2023