इंडोनेशियातल्या, जकार्ता-पालेमबंग येथे सुरू असलेल्या 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरभ चौधरीचे अभिनंदन केले आहे.
’16 वर्षाच्या सौरभ चौधरीने आपल्या युवा पिढीमधल्या क्षमतेचे आणि कौशल्याचे दर्शन घडवले आहे. या युवकाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्याचे अभिनंदन!’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
16-year old Saurabh Chaudhary illustrates the potential and prowess our youth is blessed with. This exceptional youngster brings home a Gold in the Men’s 10m Air Pistol event at the @asiangames2018. Congratulations to him! #AsianGames2018 pic.twitter.com/FHmF6TM8tK
— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2018