पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांचे अमेरिकेच्या उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "@VP म्हणून शपथ घेतल्याबद्दल @KamalaHarris यांचे अभिनंदन. ही ऐतिहासिक घटना आहे. भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे. भारत-अमेरिका भागीदारी आपल्या वसुंधरेसाठी लाभदायक आहे. "
Congratulations to @KamalaHarris on being sworn-in as @VP. It is a historic occasion. Looking forward to interacting with her to make India-USA relations more robust. The India-USA partnership is beneficial for our planet.
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2021