देशी बनावटीच्या कार्टोसॅट-3 या उपग्रहाचे वाहन करणाऱ्या PSLV-C47 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो च्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे. या उपग्रहांसोबत अमेरिकेच्या 12 पेक्षा जास्त नॅनो उपग्रहांचेही प्रक्षेपण करण्यात आले.
“देशी बनावटीच्या कार्टोसॅट-3 या उपग्रहासह अमेरिकेच्या 12 पेक्षा जास्त नॅनो उपग्रहांचेही वाहन करणाऱ्या PSLV-C47 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी इस्रोच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो.
या अत्याधुनिक कार्टोसॅट-3 मुळे हाय रिझोल्युशन इमेजिंग क्षमता वाढण्यास मदत होईल. इस्रोने पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे”, असे पंतप्रधानांनी म्हंटले आहे..
I heartily congratulate the entire @isro team on yet another successful launch of PSLV-C47 carrying indigenous Cartosat-3 satellite and over a dozen nano satellites of USA.
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2019