भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनासह जीएसएलव्ही-एफ08चे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरोच्या चमूचे अभिनंदन केले आहे.
‘जीएसएलव्ही-एफ08चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल इसरोच्या चमूचे अभिनंदन!जीसॅट-6ए हा दळणवळ उपग्रह मोबाईल ॲप्लिकेशन्ससाठी नव्या संधी निर्माण करेल. देशाला उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या इसरोच्या या कामगिरीचा अभिमान वाटतो’, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Congratulations to @isro and other stakeholders on the successful launch of GSLV-F08 with indigenous cryogenic stage.
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2018
GSAT-6A, a communication satellite, will provide new possibilities for mobile applications. Proud of @isro for taking the nation towards new heights and a brighter future.
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2018