पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूरु येथे टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय दृष्टिहीन क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
“भारताने दृष्टीहीनांसाठीचा टी-20 विश्वचषक जिंकल्याबदृदल खूप आनंद होत आहे. संघाचे अभिनंदन. त्यांच्या कर्तृत्वाचा भारताला अभिमान आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Delighted that India won the Blind T20 World Cup. Congratulations to the team. India is proud of their accomplishment.
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2017