भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. भारतीय हवाई दलाच्या क्षमता बांधणीबाबत सिंग यांच्या दृढ निश्चयामुळे आपल्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशांमध्ये म्हटले आहे. सिंग अद्वितीय हवाई योद्धा होते आणि उत्तम माणूस होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
“भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या निधनाबद्दल देशाला दु:ख होत आहे. त्यांच्या अतुलनीय देशसेवेसाठी ते आपल्या स्मरणात राहतील.
भारतीय हवाई दलाच्या क्षमता बांधणीबाबत मार्शल अर्जन सिंग यांच्या दृढनिश्चयामुळे आपल्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली.
1965 मध्ये मार्शल अर्जन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाने बजावलेली साहसी मोहीम देश कधीही विसरणार नाही.
मागे मी त्यांना भेटलो होतो. प्रकृती बरी नसताना आणि मी नाही म्हणत असताना त्यांनी सॅल्युट मारण्याचा प्रयत्न केला. एवढी लष्करी शिस्त त्यांच्या रोमारोमात भिनली होती.
भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग अद्वितीय हवाई योद्धे आणि उत्तम माणूस होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.