देशाच्या विविध भागात झालेल्या हिंसाचारांच्या घटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
‘’ आज झालेल्या हिंसाचाराच्या घटना अत्यंत विचलित करणा-या आहेत. अशा हिंसक घटनांचा मी तीव्र निषेध करीत असून, सगळ्यांनी शांतता राखावी अशी प्रार्थना करतो.
सध्या उद्भवलेल्या परिस्थितीवर कायदा आणि व्यवस्थेचे अगदी बारिक लक्ष ठेवण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार आणि गृह सचिव यांच्याबरोबर मी स्थितीविषयी चर्चा करून आढावा घेतला आहे.
परिस्थिती पूर्व पदावर येण्यासाठी अधिका-यांनी आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी सतत चौवीस तास काम करण्याचे आवाहन मी केले आहे.’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशामध्ये म्हटले आहे.
The instances of violence today are deeply distressing. I strongly condemn the violence & urge everyone to maintain peace.
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2017
The law & order situation is being closely monitored. I reviewed the situation with the NSA & Home Secretary.
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2017
Urged officials to work round the clock to restore normalcy and provide all possible assistance that is required.
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2017