Pained beyond words on the dastardly attack on peaceful Amarnath Yatris in J&K: PM Modi
India will never get bogged down by such cowardly attacks & the evil designs of hate: PM

जम्मू आणि काश्मिरमधील अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मिरचे राज्यपाल एन.एन. व्होरा आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संवाद साधला आणि शक्य ती सर्व मदत देण्याबद्दल आश्वस्त केले.

“अशा भ्याड आणि तिरस्कृत हल्ल्यांसमोर भारत कधीही झुकणार नाही.

जम्मू आणि काश्मिरमधील या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हे सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही मी करतो.

जम्मू आणि काश्मिरमध्ये शांतपणे मार्गक्रमण करणाऱ्या अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला हा हल्ला अतिशय वेदनादायी आहे. या हल्ल्याचा सगळीकडून तीव्र निषेध अपेक्षित आहे.

मी यासंदर्भात जम्मू आणि काश्मिरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांना सर्वोत्तोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Govt saved 48 billion kiloWatt of energy per hour by distributing 37 cr LED bulbs

Media Coverage

Govt saved 48 billion kiloWatt of energy per hour by distributing 37 cr LED bulbs
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 मार्च 2025
March 12, 2025

Appreciation for PM Modi’s Reforms Powering India’s Global Rise