पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजिरा येथील एलएनटी आरमोअर्ड सिस्टीम कॉम्प्लेक्सचे आज लोकार्पण केले. त्यांनी या प्रकल्पाला भेट देऊन या प्रकल्पाच्या नविनतम ऊर्जेमध्ये रुची दाखवली. तसेच नवसारी येथे पंतप्रधानांनी निराली कॅन्सर रुग्णालयाची आधारशिला ठेवली. या रुग्णालयामुळे स्थानिक लोकांना कॅन्सरवरील उपचार घेणे सोयीस्कर जाणार आहे.
तीन दिवसांच्या भेटी दरम्यान गुजरातचा दौरा आटपून ते सिल्व्हासा आणि मुंबई येथे प्रयाण करणार आहेत.
पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी व्हायब्रंट गुजरात परिषदेत ‘प्लॅगशिप जागतिक व्यापार शो’ आणि एक्झीबिशन सेंटरचे उद्घाटन त्यांनी केले. तसेच पंतप्रधानांनी राज्य कला केंद्राचे अनावरण आणि अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था या सुपर स्पेशालिटी पब्लिक हॉस्पिटलचे सुध्दा उद्घाटन केले. या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवीन भारताच्या उभारणीत ‘सबका साथ, सबका विकास’ या मूलमंत्राने आम्ही मार्गस्थ आहोत.
साबरमती नदीसमोर अहमदाबाद शॉपिंग फेस्टीव्हल 2019 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन हे एक वेगळे आकर्षण होते. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, देशात व्यावसायिक सुदृढ वातावरण निर्माण व्हावे, यासाठी त्यांचे सरकार निरंतर प्रयत्न करीत आहेत.
पंतप्रधानांनी दुसऱ्या दिवशी सुरु होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात परिषद 2019 ला भेट दिली. तसेच गांधीनगर येथील नवव्या महात्मा मंदिर प्रदर्शनी / परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारताशी व्यावसाय सुलभीकरण करणे ही एक सुवर्ण संधी आहे.
या कालावधीमध्ये त्यांनी उझबेगिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिरझीयो येव्ह, सेझ रिपब्लिकचे पंतप्रधान अँड्रीच बॅबिज, माल्टाचे पंतप्रधान डॉ. जोसेफ मस्कत आणि डेन्मार्कचे पंतप्रधान लार्स लोके रास्मुझेन यांची 18 जानेवारीला भेट घेतली. गुजरातच्या गांधीनगर मधील दांडी कुटीर येथे ‘थ्री डी लेसर प्रोजेक्शन शो’ नंतर त्यांनी द्विराष्ट्रीय संवाद साधला.
व्हायब्रंट गुजरात परिषदेत उद्योग जगतातील कॅप्टन्सनी विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक मालिका घोषित केली.