पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीर येथील नियंत्रण रेषा जवळील गोरेझ व्हॅली येथे बीएसएफ आणि भारतीय लष्कराबरोबर दिवाळी साजरी केली ते जवळ पास दोन तास तिथे होते. पंतप्रधांनाची लष्करासह सीमारेषेजवळ मनविण्यात येणारी ही सलग चौथी दिवाळी आहे.
पंतप्रधानांनी जवानांना मिठाई वाटली आणि एकमेकांना सदिच्छां दिल्यात. याप्रसंगी जवानांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येकाप्रमाणेच आपल्या कुटुंबासह दिवाळी व्यतीत करण्याची इच्छा होती आणि म्हणूनच ते सशस्त्र दलाच्या जवानांसह दिवाली मानविण्यासाठी आले आहेत”, असे ते म्हणाले, ज्यांना ते “त्याचे कुटुंब” मानतात.
सशस्त्र दलाच्या जवानांबरोबर वेळ घालविला की एक नविन ऊर्जा मिळत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले। त्यांनी सैनिकांच्या त्याग, प्रतिकूल परिस्थितीत ते देत असलेली झुंज आणि त्यांच्या शौर्याचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांना सांगण्यात आले होते की , उपस्थित असलेले जवान नियमितपणे योगाभ्यास करतात, “यामुळे त्यांच्या क्षमतेत वाढ होईल आणि शांतता अनुभवायला मिळेल”. असेही पंतप्रधान म्हणाले.
आपला कार्यकाल पुर्ण झाल्यानंतर तसेच सशस्त्र दलाची नौकरी सोडल्यानंतर जवान चांगले योग प्रशिक्षक बनू शकतात, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी भारताला वर्ष २०२२ मधे ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगतांना प्रत्येक नागरिकांनी स्वःताचे योगदान देऊन हा स्वातंत्र्य उत्सव मनविने कसे आवशयक आहे यावर भर दिला.
त्यांनी जवानांना प्रोत्साहन दिले, जेणेकरून त्यांचे नियमित कार्ये, कर्तव्ये सुलभ व सुरक्षित होतील. लष्कर, नौ सेना आणि वायुसेना दिन कसा मनविण्यात येतो आणि या दिवशी सैनिकांना कसे पुरस्कृत केले जाते याविषयी ही पंतप्रधानांनी माहिती दिली.
अभ्यागतांच्या पुस्तकात, पंतप्रधानांनी लिहिले: पंतप्रधानांनी म्हणाले की, केंद्र शासनाने मागील कैक दशकांपासून प्रलंबित एक रैंक , एक निवृति वेतन योजनेची अंमलबजावणी सैनिकांच्या कल्याणासाठी दिलेल्या शब्दानुसार केली आहे.
लष्करप्रमुख जनरल,बिपीन रावत आणि अन्य वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
अभ्यागतांच्या पुस्तकात, पंतप्रधानांनी लिहिले की :
“मातृभूमीचे संरक्षण करणे, तुमच्या प्रिय व्यक्तीं पासून दूर असतांना सुद्धा, बलिदानाची सर्वोच्च परंपरा प्रदर्शित करणे हे देशाच्या सीमेवरील सर्व सैंनिकांचे शौर्य व समर्पण यांचे प्रतीक आहेत.
मला आज तुमच्या बरोबर दिवाली साजरी करायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो शुर सैनिकांची सीमारेषेजवळील उत्सवांच्या दिवसातील उपस्थिति म्हणजे आशेचे दिप तेजोमय करणे आणि एक नविन ऊर्जा करोड़ो भारतीयांसाठी निर्मित करणे होय.
नविन भारताचे स्वप्न एकत्रितरित्या पूर्ण करण्याची सुवर्ण संधी याहून दूसरी नाही. लष्कर हे सुद्धा यातील एक भाग आहे.
दिवाळी निमित्त सर्वांना शुभेच्छा !