भारतीय जन औषधी परियोजना((PMBJP) ला मिळालेलं यश खूप समाधानकारक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेमुळे या देशातील कोट्यवधी लोकांची वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची चिंता तर दूर झाली आहेच सोबत त्यांचं आयुष्य सुद्धा सुकर झालं आहे, असं ते म्हणाले.
देश आज पाचवा जन औषधी दिवस साजरा करत आहे, असं केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्विट संदेशांच्या मालिकेत म्हटलं आहे. भारतातील सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर या योजनेनं थेट सकारात्मक परिणाम साधला आहे. देशातील बारा लाखाहून जास्त नागरिक जन औषधी केंद्रांमधून रोज औषधे खरेदी करत आहेत. या केंद्रांमधून उपलब्ध असलेली औषधे बाजारभावापेक्षा 50 ते 90 टक्के स्वस्त आहेत.
केंद्रीय मंत्र्यांच्या ट्वीट संदेशांच्या मालिकेला प्रतिसाद देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात:-
"भारतीय जन औषधी परियोजनेला मिळालेलं यश खूप समाधानकारक आहे.या योजनेमुळे देशातील कोट्यवधी लोकांची वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची चिंता तर दूर झाली आहेच सोबत त्यांचं आयुष्य सुद्धा सुकर झालं आहे."
भारतीय जन औषधि परियोजना की उपलब्धियां काफी संतोषप्रद हैं। इससे न केवल इलाज के खर्च को लेकर देश के करोड़ों लोगों की चिंताएं दूर हुई हैं, बल्कि उनका जीवन भी आसान हुआ है। https://t.co/pLzDSpCcfp
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2023