PM Modi conferred the 2018 Seoul Peace Prize for improving international cooperation, accelerating Human Development of the people of India
PM Modi awarded the 2018 Seoul Peace Prize for raising global economic growth and furthering the development of democracy through anti-corruption and social integration efforts
Seoul Peace Prize Committee praises 'Modinomics' for reducing social and economic disparity between the rich and the poor
Seoul Peace Prize Committee recognizes PM Modi's initiatives to make the government cleaner through anti-corruption measures and demonetisation
Seoul Peace Prize Committee lauds PM Modi for his contribution towards regional and global peace through a proactive foreign policy

2018 च्या सेऊल शांतता पुरस्कारासाठी पुरस्कार निवड समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य सुधारणे, जागतिक आर्थिक वृद्धीसाठी केलेले प्रयत्न भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर वाढवून मानव विकास साधण्याचा प्रयत्न आणि भ्रष्टाचारविरोधी तसेच सामाजिक एकात्मता वाढवण्यासाठी चालवलेल्या मोहिमांच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत समितीने त्यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

हा पुरस्कार मोदी यांना घोषित करतांना भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मोदी यांनी दिलेले योगदान गरीब आणि श्रीमंत यांच्यातली आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी त्यांनी आखलेली धोरणे, जी ‘मोदीनॉमिक्स’म्हणून ओळखली जातात, या कार्याची दखल समितीने घेतली आहे. त्याशिवाय भ्रष्टाचारविरोधी उपाययोजना आणि विमुद्रीकरणासारखे निर्णय घेऊन स्वच्छ कारभारासाठी मोदी घेत असलेल्या प्रयत्नांचे निवड समितीने कौतुक केले आहे. जागतिक पातळीवर यशस्वी परदेश धोरण आखून प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी पंतप्रधान करत असलेले प्रयत्न जे ‘मोदीडॉक्ट्रीन’ आणि ‘ॲक्ट इस्ट पॉलिसी’ या नावाने संबोधले जातात त्याबद्दलही समितीने मोदी यांना श्रेय दिले आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे 14 वे व्यक्ती आहेत.

या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी आपली निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरिया सरकारचे आभार मानले असून हा पुरस्कार स्वीकारला आहे.  पुरस्कार वितरण सोहळ्याची वेळ नंतर निश्चित केली जाईल.

 

पार्श्वभूमी

कोरियाची राजधानी सेऊल येथे 24व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याच्या निमित्ताने 1990 पासून सेऊल शांतता पुरस्कार दिला जातो. या क्रीडा स्पर्धेसाठी जगभरातले 160 देश एकत्र आले होते. या देशांच्या प्रतिनिधींनी निर्माण केलेल्या सौहार्द आणि मित्रत्वाच्या वातावरणामुळे जागतिक शांतता आणि सौहार्दतेला चालना मिळाली होती. या घटनेची आठवण म्हणून शांततेच्या क्षेत्रात विशेष काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. जागतिक आणि प्रादेशिक शांततेसाठी कोरियन जनतेची कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. मानवजातीत सौहार्द प्रस्थापित करणे जागतिक पातळीवर विविध देशांदरम्यान नव्याने चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आणि एकूणच जागतिक शांततेला बळकटी देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल हा द्वैवार्षिक पुरस्कार मान्यवर व्यक्तींना प्रदान केला जातो. याआधी  संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्यासह डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स सारख्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संघटनांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. यंदा या पुरस्कारासाठी जगभरातून 1300 नामांकने आली होती. या सर्व नामांकनांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आहे.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
UJALA scheme completes 10 years, saves ₹19,153 crore annually

Media Coverage

UJALA scheme completes 10 years, saves ₹19,153 crore annually
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
President of the European Council, Antonio Costa calls PM Narendra Modi
January 07, 2025
PM congratulates President Costa on assuming charge as the President of the European Council
The two leaders agree to work together to further strengthen the India-EU Strategic Partnership
Underline the need for early conclusion of a mutually beneficial India- EU FTA

Prime Minister Shri. Narendra Modi received a telephone call today from H.E. Mr. Antonio Costa, President of the European Council.

PM congratulated President Costa on his assumption of charge as the President of the European Council.

Noting the substantive progress made in India-EU Strategic Partnership over the past decade, the two leaders agreed to working closely together towards further bolstering the ties, including in the areas of trade, technology, investment, green energy and digital space.

They underlined the need for early conclusion of a mutually beneficial India- EU FTA.

The leaders looked forward to the next India-EU Summit to be held in India at a mutually convenient time.

They exchanged views on regional and global developments of mutual interest. The leaders agreed to remain in touch.