हवाई दलप्रमुखांनी नवी दिल्लीतल्या ‘एअर हाऊस’ येथे आयोजित केलेल्या ‘ॲट होम’ स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
पंतप्रधानांनी यावेळी ‘आयएएफ इनोव्हेशन डिस्प्ले’ या प्रदर्शनाला भेट दिली. नावीन्यपूर्ण शोध आणि स्वदेशीकरणाच्या माध्यमातून स्वयंपूर्णता ही या प्रदर्शनाची संकल्पना होती.
भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जुन सिंह यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरणही पंतप्रधानांनी केले.