पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 40 पेक्षा जास्त अर्थतज्ज्ञ आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञांशी “आर्थिक धोरण – भविष्यातील” या विषयावर संवाद साधला. निती आयोगाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या संवादादरम्यान सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी सूक्ष्म-अर्थव्यवस्था, कृषी आणि ग्रामीण विकास, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण, उत्पादन आणि निर्यात,शहरी विकास, पायाभूत सुविधा आदी विषयांवरील दृष्टीकोन मांडला.
या महत्वपूर्ण सूचनांबद्दल वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आभार मानले.
अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंबद्दल सहभागी वक्त्यांनी दिलेल्या सूचनांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. विविध विषयांवरील तज्ज्ञांकडून प्राप्त झालेल्या दर्जेदार सूचनांचे त्यांनी कौतुक केले.
आर्थिक विषयांशी संबंधित अनेक केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते. निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार तसेच निती आयोग आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.