राष्ट्रपती रामना कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात झालेल्या एका कार्यक्रमात 2015, 2016, 2017 आणि 2018 या वर्षांसाठीचे गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बोलतांना, प्रतिष्ठेच्या गांधी शांतता पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे पंतप्रधानांनी अभिनदंन केले. महात्मा गांधीजींची 150 वी जयंती भारत साजरी करत असताना हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. बापुजींना अत्यंत प्रिय असलेले वैष्णव जन तो हे भजन जगभरातल्या 150 देशातल्या कलाकारांनी सादर केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गांधीजींच्या शिकवणीचे आजही महत्व आहे हे संपूर्ण जगाने स्वीकारल्याचे हे द्योतक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
महात्मा गांधीजींची स्वच्छतेसाठीची कटिबद्धता पंतप्रधानांनी विषद केली.
महात्मा गांधीजीच्या दूरदृष्टी ठेवून केलेल्या प्रयत्नांमुळे, स्वातंत्र्य लढा हे जन आंदोजन ठरले. जन भागीदारी आणि जन आंदोलन यांचा संगम महात्मा गांधींनी घडवून आणला असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपणही योगदान देत आहोत ही भावना, महात्मा गांधीनी, जनतेच्या मनात रुजवली असे पंतप्रधान म्हणाले.
Congratulations to all those who have been conferred the prestigious Gandhi Peace Prize.
— PMO India (@PMOIndia) February 26, 2019
The prize is being conferred at a time when India marks the 150th birth anniversary of Mahatma Gandhi: PM @narendramodi
The freedom struggle became a mass movement due to the visionary efforts of Bapu. He merged the streams of Jan Bhagidari and Jan Andolan.
— PMO India (@PMOIndia) February 26, 2019
Bapu instilled a spirit in every person that they are doing something for India's freedom: PM @narendramodi