पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक आयोगाची प्रशंसा केली आहे.
“राष्ट्रीय मतदार दिन म्हणजे लोकशाहीची वीण मजबूत करण्यासाठी आणि निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाच्या उल्लेखनीय योगदानाचे कौतुक करण्याचे औचित्य आहे. विशेषतः तरुणांमध्ये मतदार नोंदणी सुनिश्चित करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता पसरविण्याचा हा दिवस आहे” असे पंतप्रधान म्हणाले.
National Voters Day is an occasion to appreciate the remarkable contribution of the EC to strengthen our democratic fabric and ensure smooth conduct of elections. This is also a day to spread awareness on the need of ensuring voter registration, particularly among the youth.
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2021