माणिपूरच्या नोने जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या दुर्दैवी जीवितहानीबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचे तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे;
"माणिपूरच्या नोने जिल्ह्यात झालेल्या बस अपघाताचे वृत्त दु:खद आहे. या अपघातातल्या पीडित कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त करतो. अपघातातल्या पीडीतांना माणिपूर सरकार आवश्यक ती सर्व मदत करत आहे.: PM @narendramodi"
"अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. PM @narendramodi"
Anguished by the loss of lives in Manipur's Noney district due to a tragic bus accident. My thoughts are with the bereaved families. I hope the injured recover soon. The Manipur government is providing all possible assistance to those affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 21, 2022