झारखंड राज्यात पाकूर इथे झालेल्या बस अपघातात बळी गेलेल्यांप्रती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ,पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे तर, जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
या संदर्भात केलेल्या ट्वीट मध्ये, पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे –
“झारखंडच्या पाकूर इथे झालेल्या बस अपघाताच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले आहे. या दु:खद प्रसंगी मी शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना व्यक्त करतो. अपघातातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, हीच प्रार्थना! पंतप्रधान @narendramodi”
“या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना, पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये तर, जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे”
An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives in an accident in Pakur. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 5, 2022