पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्परांना नववर्ष शुभेच्छा दिल्या.
काल रात्री दूरध्वनीवरुन झालेल्या संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी 2018 मधे भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी संदर्भात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. नवी 2+2 संवाद यंत्रणा तसेच भारत, अमेरिका आणि जपान यांच्यात प्रथमच झालेली त्रिपक्षीय चर्चा यासारख्या घडामोडींची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली.
संरक्षण, दहशतवादाला आळा घालणे तसेच ऊर्जा क्षेत्रातल्या वाढत्या द्विपक्षीय सहकार्याची आणि प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरच्या सहकार्याची उभय नेत्यांनी दखल घेतली. 2019 मध्येही भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी एकत्र काम करण्यालाही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.