राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे राष्ट्रीय एकता शपथ दिली. देशभरातल्या विविध पोलिस पथकांनी सादर केलेल्या राष्ट्रीय एकता दिन संचलनाची त्यांनी पाहणी केली.
2014 पासून 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या एकता दौडमधे समाजातल्या विविध स्तरातले लोक सहभागी होतात.
विविध राज्यांचे ध्वजवाहक आणि गुजरात छात्र सेनेने पंतप्रधानांसमोर ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेवर आधारित प्रात्यक्षिके सादर केली. पंतप्रधानांसमोर एनएसजी, सीआयएसएफ, एनडीआरएफ,सीआरपीएफ, गुजरात पोलीस, जम्मू काश्मीर पोलिसांनी आपआपल्या दलाची प्रात्यक्षिके पंतप्रधानांसमोर सादर केली.
त्यानंतर पंतप्रधानांनी केवडिया येथे तंत्रज्ञान प्रदर्शन स्थळाचे उद्घाटन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन घडवणाऱ्या आणि हवाई सुरक्षेसह पोलीस दलाच्या आधुनिकीकरणापर्यंत विविध संकल्पनांवर आधारित पोलीस दलाच्या स्टॉल्सनांही पंतप्रधानांनी भेट दिली.