Bedrock of India’s development is ‘Sabka Sath, Sabka Vikas': PM Modi
India has a long tradition of partnerships with fellow developing countries, while pursuing our own aspirations for growth: PM
PM Modi in Xiamen: Calls for coordinated action & cooperation in areas such as counter terrorism, cyber security & disaster management
Our no strings attached model of cooperation is driven purely by the requirements and priorities of our partner countries: PM

सन्माननीय महोदय,

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग,

बिक्र्समधले माझे मान्यवर सहकारी आणि नेते

आज इथे आपल्यासोबत या परिषदेत सहभागी होतांना मला अतिशय आनंद होत आहे. तुम्ही सगळे देश भारताच्या जवळचे आणि महत्वाचे भागीदार देश आहात. सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाच्या आपल्या समान प्राधान्यक्रमाच्या अनुषंगाने आमचा दृष्टीकोन आपल्यासमोर मांडताना मला अतिशय आनंद होत आहे. या संवादासाठी आपल्या सर्वांना एका व्यासपीठावर आणल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचेही आभार मानतो.

मान्यवर,

संयुक्त राष्ट्रांचा २०३० चा अजेंडा आपण सर्वांनी दोन वर्षांपूर्वी स्वीकारला आणि शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टे गाठण्याच्या दृष्टीने आपण आता एकत्रित कृती करण्याची गरज आहे हे मला अधोरेखित करायचे आहे. जुलै महिन्यात भारताने शाश्वत विकासाच्या उद्दिष्टसंदर्भात राष्ट्रीय पातळीवर एक सर्वेक्षण पूर्ण केले. आमच्या विकासाच्या अजेंड्याचे ध्येय्य ‘आमच्या सबका साथसबका विकास या घोषणेतून स्पष्ट होईल. याचा अर्थ- सर्वांचे प्रयत्नसर्वसमावेशक विकास... शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या कल्याणकारी योजनांशी त्याची सांगड घातली आहे.केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या सर्व योजनांच्या माध्यमातून शाश्वत विकास गाठण्याचे आमचे प्रयत्न आहेत. शाश्वत विकासाच्या धोरणांवर आमच्या संसदेतही साधकबाधक चर्चा झाली. प्राधान्यक्रमाने ठरवण्यात आलेली आमची उद्दिष्टे गाठण्यासाठीआम्ही आमच्या योजना कालबद्धरीत्या पूर्ण करण्यावर भर देत आहोत. एक उदाहरण द्यायचे झाल्यासबँकिग व्यवस्थेत नसलेल्या नागरिकांना खाते उघडण्याची संधी देणेप्रत्येकाला बायोमेट्रिक ओळखपत्र देणे आणि त्याच्याशी  मोबाईल क्रमांक जोडूनलाभार्थ्यांना योजनेचे लाभ मिळतील अशी व्यवस्था करणारी त्रिसूत्री योजना आम्ही सुरु केली. या योजनेच्या मदतीनेपहिल्यांदाच३६ कोटी लोकांपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून योजनेचे थेट लाभ पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो. 

मान्यवर 

भक्कम जागतिक भागीदारीमुळे आमच्या या प्रयत्नांना मोठे पाठबळ मिळाले आहे. आणि त्यासाठी आमच्या बाजूने असलेली जबाबदारी पार पाडण्यास आम्ही तयार आहोत. आपल्या देशाच्या विकासाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतांनाच, इतर विकसनशील राष्ट्रांसोबत भागीदारीची भारताला दीर्घ परंपरा आहे. प्रत्येक पावलावर आम्ही विविध क्षेत्रातले आमचे अनुभव आणि स्त्रोतइतर भागीदारांना दिले आहेत. मग ते लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत करण्यापासून ते जनकल्याणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान देण्यापर्यंत कुठलीही मदत असोआम्ही आमच्या भागीदार राष्ट्रांना अशी सर्व मदत केली. याच वर्षाच्या सुरुवातीला आम्ही एक दक्षिण आशियाई उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला. आमच्या शेजारच्या राष्ट्रांनाशिक्षणआरोग्यदळणवळण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी या उपग्रहाची मदत होईल. गेल्या अर्ध्या शतकापासून भारताच्या पथदर्शी उपक्रमांमध्ये- भारतीय तंत्रज्ञान आणि वित्तीय सहकार्यआय टीईसीने आशियाआफ्रिकापूर्व युरोपलॅटीन अमेरिकाकरेबियन आणि प्रशांत महासागरातील बेटांवरच्या राष्ट्रांसह १६१ राष्ट्रांना प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी मदत केली आहे. आयटीईसीने एकट्या आफ्रिकेतल्या २५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. २०१५ साली झालेल्या तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेत,५४ आफ्रिकन देशांसोबतआम्ही ही शिष्यवृत्ती पुढच्या पाच वर्षात दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाआणि ती संख्या ५० हजार विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतात प्रशिक्षण घेतलेले आफ्रिकेतील सोलर मामास आफ्रिका खंडातल्या हजारो घरांमध्ये वीजपुरवठा करून  प्रकाश देत आहेत. आफ्रिकी देशांसोबत अधिक दृढ झालेल्या आमच्या संबंधांची परिणीती म्हणजेआफ्रिकन विकास बँकेची यावर्षीची सर्वसाधारण सभा इतिहासात पहिल्यांदाच आफ्रिका खंडाच्या बाहेरभारतात झाली. भागीदारीतून उभारण्यात आलेल्या आपल्या विकास प्रकल्पांमुळे जगभरातल्या डझनाहून जास्त देशांमध्ये पाणीवीज रस्ते आरोग्यटेली-मेडिसिन आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. या सगळ्याच्या पलीकडेआमच्या विनाअट सहकार्याच्या धोरणानुसारआम्ही केवळ आमच्या भागीदार राष्ट्राच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाला महत्व दिले आहे.

मान्यवर

आज इथे उपस्थित देश जगातल्या अर्ध्याहून जास्त मानवतेचे प्रतिनिधित्व करत आहेत.आपण जे काही करूत्याचा जगावर निश्चित परिणाम जाणवेल. त्यामुळेच हे जग अधिक सुंदरसुखकर बनवणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य असायला हवे. ब्रिक्सच्या माध्यमातून एकेक वीट रचत या सुंदर जगाची उभारणी आपण करायला हवी. ब्रिक्सच्या मदतीने येत्या दहा वर्षात जागतिक परिवर्तन घडवण्याचे उद्दिष्ट आपण ठरवायला हवेअसे मी काल बोललो होतो. त्यादृष्टीनेहे दशक आपल्यासाठी ‘सुवर्ण दशक ठरू शकेल. या दिशेने आपण एक कृतीशील प्रतिसादधोरणे आणि कृती आराखडा ठरवायला हवामी त्यासाठी दहा शिफारसी करु इच्छितोत्या पुढीलप्रमाणे:  

१. एक सुरक्षित जग निर्माण करणे :यासाठी दहशतवाद विरोधी धोरणसायबर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या तीन क्षेत्रात संघटीत आणि समन्वय कृती करणे.

२ एक हरित जग निर्माण करणे : हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक ठोस कृती करणेज्यात आंतरराष्ट्रीय सौर उर्जा सहकार्य सारख्या गोष्टींचा समावेश असेल.

 ३. एक आधुनिकसज्ज जग निर्माण करणे : जागतिक कार्यक्षमताअर्थव्यवस्था आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी परस्पर सहकार्य आणि आवश्यक त्या तंत्रज्ञानाची मदत एकमेकांना करणे.

 ४. एक सर्वसमावेशक जग निर्माण करणे: बँकिंग आणि इतर वित्त व्यवस्थांमध्ये अधिकाधिक लोकांना समाविष्ट करून हे उद्दिष्ट साध्य करता येईल.

 ५. डिजिटल जगाची निर्मिती करणे : अर्थव्यवस्थेच्या आत आणि बाहेरही असलेली डिजिटल दरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे.

 ६. कुशल जगाची निर्मिती करणे : जगातल्या लक्षावधी युवकांनाभविष्यात उपयोगी ठरतील अशी कौशल्ये शिकवूनकुशल मनुष्यबळ तयार करणे.

 ७. निरोगी जागा निर्माण करणे: आजारांचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी तसेचसर्वांना परवडणारी आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी संशोधन आणि विकास क्षेत्रात सहकार्य वाढवणे.

 ८. एका समान जगाची निर्मिती करणे : सर्वाना समान संधी देणेलैंगिक भेदभाव दूर करणे

 ९. एकमेकांशी जोडलेले जग निर्माण करणे : सगळीकडे मालव्यक्ती आणि सेवांचा मुक्त पुरवठा होईलअशी व्यवस्था निर्माण करणे.

 १०. एक सौहार्दपूर्ण जग निर्माण करणे : विचारसरणीपद्धती आणि परंपरा हा जगात परस्पर सहवास आणि शांततापूर्ण सहकार्य नांदण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांच्या आधारावर एक सौहार्दपूर्ण जग निर्माण करणे.

हा दहा कलमी कार्यक्रम आणित्यावरची कृतीशील वाटचालयामुळे आपण जागतिक समुदायाच्या कल्याणासाठी भरीव योगदान देऊ शकतो. आणि या कार्यात भारत इतर देशांच्या प्रयत्नांत कृतीशील प्रतिसाद आणि सहकार्य करण्यास कायमच तत्पर राहील. या परिषदेचे प्रभावी आयोजन केल्याबद्दल तसेच२०१७ या वर्षात ब्रिक्सचे अध्यक्षपद समर्थपणे भूषवल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आभार मानतो. चीनमधल्या झियामेन या सुंदर शहरातआमचं हार्दिक स्वागत आणि आदरातिथ्य केल्याबद्दलहि मी त्यांना धन्यवाद देतो. मी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचेही स्वागत करतो आणि पुढच्या वर्षी जोहान्सबर्ग इथे होणाऱ्या शिखर  परिषदेत पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही देतो. 

धन्यवाद !  

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
UJALA scheme completes 10 years, saves ₹19,153 crore annually

Media Coverage

UJALA scheme completes 10 years, saves ₹19,153 crore annually
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
President of the European Council, Antonio Costa calls PM Narendra Modi
January 07, 2025
PM congratulates President Costa on assuming charge as the President of the European Council
The two leaders agree to work together to further strengthen the India-EU Strategic Partnership
Underline the need for early conclusion of a mutually beneficial India- EU FTA

Prime Minister Shri. Narendra Modi received a telephone call today from H.E. Mr. Antonio Costa, President of the European Council.

PM congratulated President Costa on his assumption of charge as the President of the European Council.

Noting the substantive progress made in India-EU Strategic Partnership over the past decade, the two leaders agreed to working closely together towards further bolstering the ties, including in the areas of trade, technology, investment, green energy and digital space.

They underlined the need for early conclusion of a mutually beneficial India- EU FTA.

The leaders looked forward to the next India-EU Summit to be held in India at a mutually convenient time.

They exchanged views on regional and global developments of mutual interest. The leaders agreed to remain in touch.