पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आणि राज्यांच्या पर्यटन, सांस्कृतिक आणि क्रीडा खात्याच्या मंत्र्यांच्या परिषदेला आणि सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला उद्घाटनप्रसंगी ( व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे) संबोधित केले. हा कार्यक्रम गुजरातमधील कच्छ येथे आयोजित करण्यात आला होता.
क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था आवश्यक असल्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. खेळ लोकप्रिय करण्यासाठी सरकार आणि राज्य सरकारे इच्छुक असल्याचे ते म्हणाले. जिल्हा पातळीवर गुणवत्ता हेरण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, जेणे करुन त्यानुसार पायाभूत सुविधांची आखणी करता येईल असेही ते म्हणाले.
पर्यटनामध्ये भारतात इतक्या संधी आहेत की संपूर्ण जग भारताकडे आकर्षित होईल. भारतातील तरुण मंडळी डिजिटल उपक्रम आणि स्वच्छ भारत अभियानासारख्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना बळ देत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. प्रत्येक राज्याने काही ठिकाणे निवडावीत. जागतिक दर्जाच्या पर्यटन विषयक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात आणि जगाला तिथे आकर्षित करावे अशी सूचना त्यांनी केली.
पंतप्रधानांनी या परिषदेसाठी जमलेल्या प्रतिनिधींना राज्यांमधिल विविध परस्पर उपक्रमांच्या माध्यमातून “एक भारत श्रेष्ठ भारताची” अंमलबजावणी करण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, आणि केंद्रीय राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार) विजय गोयल आणि डॉ. महेश शर्मा उपस्थित होते.
Essential to understand the work that we are doing particularly in the context of the changing world: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 20, 2017
We need an institutional arrangement that enables excellence in sports because I am sure every government wants to popularise sports: PM
— PMO India (@PMOIndia) January 20, 2017
What is needed is proper mapping at the district level so that we can understand where is our talent & where is the infrastructure: PM
— PMO India (@PMOIndia) January 20, 2017
A digital movement in the nation is going on and the youth are at the core of this. Our youth gave strength to Swachh Bharat Mission too: PM
— PMO India (@PMOIndia) January 20, 2017
As far as tourism is concerned, India is blessed with so much potential and this can draw the world to India: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 20, 2017
Each state should pick a few destinations and create world class tourism infrastructure & draw the world there: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 20, 2017