लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी सोहळयानिमित्त आयोजित सहकार संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहिले.
यावेळी समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आपला देश “बहुरत्न वसुंधरा” आहे, जिथे अनेक लोकांनी वेगवेगळया प्रांतात आणि वेगवेगळया कालखंडात मोठे योगदान दिले आहे. त्यापैकी काहींना प्रसिध्दी मिळाली, मात्र असेही अनेकजण आहेत ज्यांनी अमूल्य योगदान दिले आणि तरीही ते अपरिचितच राहिले. वकील साहेब – लक्ष्मणराव इनामदार हे त्यापैकी एक आहेत असे पंतप्रधान म्हणाले. अपरिचित राहूनही प्रत्येकाला एकत्र आणणे हे सहकारी चळवळीचे पहिले तत्व असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, इनामदारांनी हे तत्व अंगीकारले आणि त्यांचे आयुष्य हे प्रेरणेचा स्रोत आहे.
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे आणि त्यांचे आयुष्य हे प्रेरणेचा स्रोत आहे. ग्रामीण आणि शहरी भागात संतुलित विकास या उद्दिष्टांबाबतही बोलतांना पंतप्रधान म्हणाले की ही उद्दिष्टे साध्य करण्यात सहकार चळवळ महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकते.
सहकार चळवळीतील “भावना” जतन करण्याच्या महत्वावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, ग्रामीण भागात अजूनही मोठया प्रमाणावर ही “भावना” अबाधित आहे. “विना संस्कार, नहीं सहकार” या इनामदारांच्या मंत्राचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पंतप्रधान म्हणाले कि आज शेतकरी किरकोळ दरात खरेदी करतो आणि घाऊक दरात विकतो. दलाली बंद करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी ही प्रक्रिया उलट करणे गरजेचे आहे. जनतेच्या समस्या सोडवण्याची क्षमता सहकार चळवळीत असल्याचे ते म्हणाले. भारतीय समाजाच्या स्वभावाला अनुरुप अशी सहकार चळवळ असल्याचे ते म्हणाले. युरियाला कडुनिंबाचे विलेपन, मधमाशी पालन यांसारख्या क्षेत्रात चळवळ लक्षणीय योगदान देऊ शकते असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी दोन पुस्तके प्रकाशित केली. लक्ष्मणराव इनामदार यांच्यावरचे एक आणि दुसरे “नाईन जेम्स ऑफ इंडियन को-ऑपरेटिव्ह मूव्हमेंट” तसेच यावेळी सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Cooperative movements are not only about systems. There is a spirit that brings people together to do something good: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 21, 2017
There are several sectors where the cooperative sector can help make a positive difference: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 21, 2017
It is natural for the cooperative sector to grow and shine in India: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 21, 2017