BRICS Business Council Meet: PM Modi pitches for expanding business cooperation between member countries
India is changing fast into one of the most open economies in the world with FDI inflows at an all-time high: PM Modi
GST is India's biggest economic reform ever; in one stroke, a unified market of 1.3 billion people has been created: PM
Digital India, Start-Up India and Make in India are altering economic landscape of India: PM Modi

मान्यवर,

न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष,

ब्रिक्स व्यापार परिषदेचे सदस्य

ब्रिक्स व्यापार परिषदेसोबत या बैठकीत सहभागी होताना मला आनंद होत आहे. ब्रिक्स भागीदारीच्या दृष्टीकोनाला साकार करण्यासाठी व्यापार परिषदेत तुम्ही करत असलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. आपण तयार केलेली भागीदारी आणि नेटवर्क प्रत्येक ब्रिक्स देशामधील आर्थिक विकासाच्या कथा सांगत आहेत. गेल्या वर्षी गोव्यामध्ये झालेल्या बैठकीत सूचना आली होती की, नवीन विकास बँक अर्थात एनडीबी आणि ब्रिक्स व्यापार परिषदेमध्ये दृढ सहकार्य असावे. तुम्ही एनडीबीसोबत सामंजस्य करार करत आहात ही आनंदाची बाब आहे.

मान्यवर आणि मित्रांनो,

भारत जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे. आत्तापर्यंत भारतात सर्वाधिक 40 टक्क्यांपर्यंत थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. जागतिक बँकेच्या अनुक्रमाणिकेमध्ये व्यापार सुलभीकरणात भारताचे स्थान वर गेले आहे. तसेच जागतिक स्पर्धात्मक अनुक्रमाणिकेमध्ये मागील दोन वर्षात आम्ही 32 गुणांनी वर गेलो आहोत. जुलै महिन्यात अंमबजावणी करण्यात आलेली वस्तू आणि सेवा कर कायदा ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया आणि मेक इन इंडिया सारखे कार्यक्रम भारताचा आर्थिक चेहरामोहरा बदलवत आहेत. भारताला ज्ञानाधारित, कौशल्य आणि तंत्रज्ञान प्रेरित समाज बनायला हे सर्व मदत करत आहेत.

मान्यवर आणि मित्रांनो,

व्यापार आणि गुंतवणूक, कौशल्य विकासाला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांचा विकास, एसएसएमई विकास, ई-वाणिज्य आणि डिजिटल अर्थव्यवस्था या सर्वांना ब्रिक्स व्यापार परिषद देखील प्राधान्य देते हे जाणून आनंद झाला. ब्रिक्स मानांकन संस्था, ऊर्जा सहकार्य, हरीत अर्थव्यवस्था आणि डिजिटल अर्थव्यवस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने तुम्ही करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. तुम्ही करत असलेल्या सर्व प्रयत्नांना आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ. तसेच व्यापार वृद्धी आणि गुंतवणूक सहकार्यासारख्या समान उद्दीष्टांना आपण एकत्रितपणे पूर्ण करुया.

धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage