पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्लोव्हाक गणराज्याचे पंतप्रधान एडूआर्ड हेगर यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
युक्रेनमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आणि मायदेशी परत आणण्यासाठीच्या विशेष विमानांना परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी एडूआर्ड हेगर यांचे आभार मानले. पुढच्या काही दिवसांत तणावग्रस्त भागातून भारत इतर नागरिकांना मायदेशी परत आणणार आहे, त्या दरम्यान मदत करावी अशी विनंती त्यांनी केली.
पंतप्रधानांनी हेगर यांना, भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याच्या प्रयत्नांचे विशेष दूत म्हणून कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू, यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती दिली.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या हिंसा आणि मानवतेवर आलेल्या संकटावर दुःख व्यक्त केले आणि भारत सतत करत असलेल्या, युद्धबंदी करून चर्चेने प्रश्न सोडविण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदींनी देशांचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रांची प्रादेशिक एकात्मता याचा सन्मान करणे महत्वाचे आहे यावर भर दिला.