पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. फिलीपिन्सचे सतरावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्यातील अनेक मुद्द्यांचा आढावा घेतला आणि अलिकडच्या वर्षांत दोन्ही देशांमधील वेगाने वाढणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
पंतप्रधानांनी, भारताच्या पूर्वेकडील राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या ऍक्ट इस्ट धोरणानुसार फिलीपिन्सचे महत्व अधोरेखित केले, भारताच्या हिंद प्रशांत क्षेत्राबाबतच्या दृष्टीकोनाबद्दल माहिती दिली आणि दोन्ही राष्ट्रातले संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांना फिलीपिन्सच्या विकासासाठीच्या त्यांच्या योजना आणि प्रकल्पांमध्ये भारताचा पूर्ण पाठींबा असेल असे आश्वासन दिले.