गुजरातमध्ये 55,500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण,पायाभरणी आणि कामांचा प्रारंभ पंतप्रधान करणार
काक्रापार अणुऊर्जा केंद्रात, केएपीएस-3 आणि केएपीएस-4 या दोन नवीन प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्सचे पंतप्रधान करणार राष्ट्रार्पण
गुजरातमध्ये रस्ते, रेल्वे, ऊर्जा, आरोग्य, इंटरनेट संपर्क व्यवस्था, शहरी विकास, पाणीपुरवठा, पर्यटन या क्षेत्रांना मिळणार मोठी चालना
वडोदरा मुंबई द्रुतगती मार्ग आणि भारत नेट टप्पा दोन प्रकल्पाच्या महत्त्वाच्या भागांचे पंतप्रधान करणार लोकार्पण
नवसारीतील पीएम मित्र पार्कच्या बांधकाम कामाचा पंतप्रधान करणार प्रारंभ
अंबाजी येथील रिंछडिया महादेव मंदिर आणि तलावाच्या विकासाची पंतप्रधान करणार पायाभरणी
अहमदाबादमध्ये गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान होणार सहभागी
महेसाणा येथील वलीनाथ महादेव मंदिरात पंतप्रधान करणार पूजा आणि दर्शन
वाराणसी आणि त्याच्या लगतच्या परिसराचा कायापालट करण्याच्या आणखी एका टप्प्यात, 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान करणार उद्घाटन आणि पायाभरणी
रस्ते, उद्योग, पर्यटन, वस्त्रोद्योग, आरोग्य या क्षेत्रांना वाराणसीमध्ये मिळणार मोठी चालना
संत गुरु रविदास यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेऊन पंतप्रधान करणार पूजा
बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्वतंत्रता सभागृहातील पारितोषिक वितरण समारंभात पंतप्रधान होणार सहभागी

पंतप्रधान, 22 आणि 23 फेब्रुवारी 2024 रोजी गुजरात आणि उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. 

पंतप्रधान, 22 फेब्रुवारी रोजी, सकाळी 10:45 वाजता, अहमदाबाद येथे, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ) सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. ते  दुपारी 12:45 वाजता महेसाणा येथे पोहोचतील आणि वलीनाथ महादेव मंदिरात पूजा करतील तसेच दर्शन घेतील. त्यानंतर,  दुपारी 1 वाजता,  महेसाणातील तारभ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. ते येथे  8,350 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील. पंतप्रधान, दुपारी 4:15 च्या सुमारास नवसारी येथे पोहोचतील. तिथे ते सुमारे 24,700कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि कामांचा प्रारंभ करतील. संध्याकाळी सुमारे 6:15 वाजता, काक्रापार अणुऊर्जा केंद्राला ते भेट देतील.

पंतप्रधान 23 फेब्रुवारी रोजी, वाराणसीमध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्वतंत्रता सभागृहात  संसद संस्कृत स्पर्धेच्या विजेत्यांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात सहभागी होतील. ते सकाळी 11:15 वाजता,  संत गुरु रविदास यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता,  संत गुरु रविदास यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त आयोजित सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. पंतप्रधान, दुपारी 1:45 वाजता,  सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. येथे ते वाराणसीमधील 13,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधानांचा गुजरात दौरा

गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ) सुवर्ण महोत्सवी समारंभात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. जीसीएमएमएफच्या सुवर्ण महोत्सवी सोहळा अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडीयम मध्ये होणार असून यात एक लाख 25 हजारांहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. जीसीएमएमएफ ही सहकारी संस्थांची ध्येयासक्ती, त्यांची उद्योजकतेची वृत्ती आणि शेतकऱ्यांचा दृढनिश्चय याची निदर्शक आहे. यामुळेच अमूल हा जगातील सर्वात सक्षम अशी दुग्ध नाममुद्रा बनला आहे.

गुजरातमधील मेहसाणा आणि नवसारी येथे होणाऱ्या दोन सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.   गुजरातमधील रस्ते, रेल्वे, ऊर्जा, आरोग्य, इंटरनेट संपर्क व्यवस्था, शहरी विकास, पाणीपुरवठा, पर्यटन,पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि आदिवासी विकास   इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रांचा या प्रकल्पांमध्ये समावेश असेल.

महेसाणातील तारभ येथील सार्वजनिक कार्यक्रमात 8 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींना अतिजलद (हाय-स्पीड) इंटरनेट पुरवणाऱ्या भारत नेट टप्पा दोन-गुजरात फायबर ग्रीड नेटवर्क लिमिटेडसह महत्त्वाचे प्रकल्प, रेल्वे मार्ग दुहेरीकरण, गेज रूपांतरण, महेसाणा आणि बनासकांठा जिल्ह्यांमध्ये नवीन ब्रॉड गेज मार्गासाठी अनेक प्रकल्प; खेडा, गांधीनगर, अहमदाबाद आणि महेसाणा येथे अनेक रस्ते प्रकल्प; गांधीनगर येथे गुजरात जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची मुख्य शैक्षणिक इमारत; याबरोबरच बनासकांठा येथे अनेक पाणीपुरवठा प्रकल्प यांचे पंतप्रधान राष्ट्रार्पण करतील.

आणंद जिल्ह्यातील नवीन जिल्हास्तरीय रुग्णालय आणि आयुर्वेदिक रुग्णालयासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प;  बनासकांठामधील अंबाजी प्रदेशातील रिंछडिया महादेव मंदिर आणि तलावाचा विकास;  गांधीनगर, अहमदाबाद, बनासकांठा आणि महेसाणा येथे अनेक रस्ते प्रकल्प;  डीसा येथील वायुदलाची धावपट्टी; अहमदाबादमधील मानवी आणि जैव विज्ञान दालन; गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केन्द्र  (जीबीआरसी) गिफ्ट सिटी येथे नवीन इमारत;  गांधीनगर, अहमदाबाद आणि बनासकांठा येथे पाणीपुरवठा सुधारण्यासाठी अनेक प्रकल्प यांची कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान पायाभरणी करतील.

नवसारी येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात, वडोदरा मुंबई द्रुतगती मार्गाचे अनेक पॅकेज, भरूच, नवसारी, वलसाड येथील अनेक रस्ते प्रकल्प, तापी येथील ग्रामीण पेयजल पुरवठा प्रकल्प, भरूच येथील भूमिगत जलनिस्सारण प्रकल्प यासह अनेक विकास प्रकल्प पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. नवसारी येथे  पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपेरल (पीएम मित्र) उद्यानाच्या बांधकामाच्या कामाचाही पंतप्रधान प्रारंभ करतील.

या कार्यक्रमादरम्यान, भरुच-दहेज प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गाचे  बांधकाम; एसएसजी रुग्णालय, वडोदरा मधील अनेक प्रकल्प;  वडोदरा येथील प्रादेशिक विज्ञान केंद्र;  सुरत, वडोदरा आणि पंचमहालमध्ये रेल्वे गेज परिवर्तनासाठी प्रकल्प;  भरूच, नवसारी आणि सुरतमध्ये अनेक रस्ते प्रकल्प;  वलसाडमधील अनेक पाणीपुरवठा योजना, शाळा आणि वसतीगृह इमारत आणि नर्मदा जिल्ह्यातील इतर प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

सुरत महानगरपालिका, सुरत शहरी विकास प्राधिकरण आणि ड्रीम सिटीच्या अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत

काक्रापार अणुऊर्जा केंद्र (केएपीएस) युनिट 3 आणि युनिट 4 मधील  दोन नवीन प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्सचे (पीएचडब्ल्यूआर) राष्ट्रार्पण पंतप्रधान करणार आहेत.भारतीय अणुऊर्जा महामंडळ मर्यादित  (एनपीसीआयएल) द्वारे 22,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधलेले, केएपीएस-3 आणि केएपीएस-4 प्रकल्पांची एकत्रित क्षमता 1400 (700*2) मेगावॅट आहे आणि ते सर्वात मोठे स्वदेशी पीएचडब्ल्यूआर आहेत.

जगातील सर्वोत्कृष्ट अणुभट्ट्यांशी तुलना करता येणारी अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह या अशा प्रकारच्या पाहिल्याच अणुभट्ट्या आहेत. या दोन अणुभट्ट्या मिळून प्रतिवर्षी सुमारे 10.4 अब्ज युनिट स्वच्छ विजेचे उत्पादन करतील आणि गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील ग्राहकांना याचा फायदा होईल.

वाराणसीमध्ये पंतप्रधान

2014 पासून, पंतप्रधानांनी रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, पेयजल, शहरी विकास आणि स्वच्छता यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी अनेक विकास प्रकल्प सुरू करून वाराणसी आणि  लगतच्या भागाचा कायापालट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधान वाराणसीमध्ये 13,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे लोकार्पण  आणि पायाभरणी करणार आहेत.

वाराणसीच्या रस्ते संपर्क सुविधेचा आणखी विस्तार करण्यासाठी  अनेक रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत, यात राष्ट्रीय महामार्ग -233 च्या घाघरा-पूल-वाराणसी विभागाचे चौपदरीकरण;  राष्ट्रीय महामार्ग-56 च्या सुलतानपूर-वाराणसी विभागाचे चौपदरीकरण, पॅकेज-1; राष्ट्रीय महामार्ग-19 च्या वाराणसी-औरंगाबाद विभागाच्या टप्पा-1 चे सहापदरीकरण;  राष्ट्रीय महामार्ग-35 वर पॅकेज-1 वाराणसी-हनुमना विभागाचे चौपदरीकरण;  आणि बाबतपूर जवळ वाराणसी-जौनपूर रेल्वे विभागामधील रस्ते पूल (आरओबी) या प्रकल्पांचा समावेश आहे. वाराणसी-रांची-कोलकाता द्रुतगती मार्ग पॅकेज-1 च्या बांधकामाची पायाभरणीही ते करणार आहेत.

या प्रदेशातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान, सेवापुरीमध्ये एचपीसीएलचे एलपीजी बॉटलिंग संयंत्र; यूपीएसआयडीए ॲग्रो पार्क कारखियांमध्ये बनास काशी संकुल दूध प्रक्रिया युनिट;  यूपीएसआयडीए ॲग्रो पार्क कारखियांमध्ये येथे विविध पायाभूत सुविधांच्या कामांचे;आणि विणकरांसाठी  सिल्क फॅब्रिक प्रिंटिंग सामान्य सुविधा केंद्राचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

वाराणसीमध्ये अनेक शहरी विकास प्रकल्पांचे लोकार्पण देखील पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये रमणा येथील एनटीपीसीच्या कोळसा संयंत्रामध्ये नागरी कचरा व्यवस्थापन;  सिस-वरुणा भागातील पाणीपुरवठा जाळ्याची सुधारणा;  आणि एसटीपी आणि सांडपाणी पंपिंग स्टेशनचे ऑनलाइन सांडपाणी निरीक्षण आणि एससीएडीए ऑटोमेशन या प्रकल्पांचा समावेश आहे.

तलावांचे पुनरुज्जीवन आणि उद्यानांच्या पुनर्विकासासाठी प्रकल्प;आणि 3-डी अर्बन डिजिटल नकाशा आणि डेटाबेसच्या डिझाइन आणि विकासासाठीच्या प्रकल्पांसह वाराणसीच्या सुशोभीकरणासाठी अनेक प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

वाराणसीमध्ये पर्यटन आणि अध्यात्मिक पर्यटनाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.या प्रकल्पांमध्ये पंचकोशी परिक्रमा मार्गाच्या पाच पाडवांवर सार्वजनिक सुविधांचा पुनर्विकास आणि दहा अध्यात्मिक यात्रेसह पावनपथ ;  वाराणसी आणि अयोध्येसाठी भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण  द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रिक कॅटामरन जहाजाचा प्रारंभ;  आणि सात चेंज रूम तरंगत्या जेटी आणि चार कम्युनिटी जेटी यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक कॅटामरन हरित ऊर्जेचा  वापर करून गंगेतील पर्यटन अनुभव वाढवेल.

पंतप्रधान विविध शहरांमधील भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरणाच्या  तेरा सामुदायिक जेटी आणि बलिया येथे जलद तरंगता पूल उघडण्याच्या यंत्रणेची देखील  पायाभरणी  करतील..

वाराणसीच्या प्रसिद्ध वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान वाराणसीमध्ये राष्ट्रीय  फॅशन तंत्रज्ञान संस्थेची  (एनआयएफटी) पायाभरणी करणार आहेत.ही नवीन संस्था वस्त्रोद्योग क्षेत्रातील शिक्षण आणि प्रशिक्षण पायाभूत सुविधा बळकट करेल.

वाराणसीमध्ये आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत, वाराणसीमधील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी पंतप्रधान करतील. बनारस हिंदू विद्यापिठातील  नॅशनल सेंटर ऑफ एजिंगची पायाभरणीही करतील.सिग्रा क्रीडा स्टेडियम टप्पा-1 आणि जिल्हा रायफल शूटिंग रेंजचे उद्‌घाटन पंतप्रधान करणार असून हे शहरातील क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

बनारस हिंदू विद्यापिठाच्या स्वतंत्रता सभागृहात  बक्षीस वितरण समारंभात पंतप्रधान काशी संसद ज्ञान स्पर्धा, काशी संसद छायाचित्रण स्पर्धा आणि काशी संसद संस्कृत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करतील.ते वाराणसीच्या संस्कृत अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश संच, संगीत वाद्ये आणि गुणवत्ता शिष्यवृत्तीचे वितरणही करणार आहेत. ते काशी संसद छायाचित्रण स्पर्धा दालनाला देखील  भेट देतील आणि "संवर्ती काशी" या संकल्पनेवर आधारित छायाचित्र काढणाऱ्या  सहभागींशी संवाद साधतील.

बनारस हिंदू विद्यापीठा जवळील  सीर गोवर्धनपूर येथील संत गुरु रविदास जन्मस्थळी मंदिरात, पंतप्रधान रविदास उद्यानाशेजारील संत रविदासांच्या नव्याने स्थापित केलेल्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. संत रविदास जन्मस्थळी सुमारे 32 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन आणि सुमारे 62 कोटी रुपये खर्चाच्या  संत रविदास संग्रहालयाची आणि  उद्यानाच्या सुशोभीकरणाची पायाभरणी भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025

Media Coverage

India’s Space Sector: A Transformational Year Ahead in 2025
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 डिसेंबर 2024
December 24, 2024

Citizens appreciate PM Modi’s Vision of Transforming India