"भाजपचा प्रवास हा भारतीय जनतेमध्ये आशेचा किरण निर्माण करणारा आहे. आज भाजपा जिथे पोहोचली आहे, ते केवळ एका व्यक्तीमुळे नाही तर अनेक पिढयांतील कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रम आणि त्यागामुळे. आमच्यासाठी राष्ट्र हे नेहमी पक्षापेक्षा सर्वोच्च स्थानी असेल. “भारत प्रथम” या आमच्या बोधवाक्यासह भाजपा पुढे जात राहील."

६ एप्रिल २०१३ रोजी अहमदाबाद येथे कार्यकर्त्यांच्या महासंमेलनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना

Organiser par excellence: Man with the Midas Touchपक्षाच्या ३३व्या वर्धापनदिनी भाजपा कार्यकर्त्यांच्या महासंमेलनाला मोदी संबोधित करताना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पक्ष कार्यकर्ता म्हणून त्यांचा प्रवास सुरु केला. संघटनात्मक जाणीव आणि नेमून दिलेले काम प्रभावीपणे करणे या त्यांच्या गुणांमुळे ते देशातील सर्वोच्च पदावर पोहोचले. पक्षाचे कार्यकर्ते असतानाही दिलेली कोणतीही संघटनात्मक भूमिका पार पाडण्याची क्षमता त्यांच्यात दिसली. पक्षाच्या वाढीसाठी महत्वपूर्ण अशा भागात समस्येचे निवारण करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ त्यांना तिथे पाठवायचे. जेव्हा-जेव्हा पक्षात त्यांना एखादी जबाबदारी दिली जायची- मग ते सभेचे आयोजन असो किंवा प्रतिकूल भागात निवडणूक प्रचारक असो, त्यांनी नेहमी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावली.

अजूनही, ते प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक भूमिकेवर भर देण्याचे महत्व अधोरेखित करतात आणि अनेकदा त्याबाबत बोलतात.

नरेंद्र मोदी यांनी वरील भाषण अहमदाबाद येथे सप्टेंबर महिन्यात भर उन्हात दुपारी केले, भारतीय जनता युवा मोर्चाच्या , जी भाजपाची युवा संघटना आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते. मतदान केंद्र व्यवस्थापनाचे महत्व हा त्यांच्या भाषणाचा गाभा होता.

"निवडणुकीदरम्यान, मतदान केंद्र व्यवस्थापन खूप महत्वाचे असते. ज्याप्रमाणे, गड जिंकल्याशिवाय तुम्ही लढाई जिंकू शकत नाही, त्याप्रमाणे मतदान केंद्रावर विजय मिळविल्याशिवाय तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही. मतदान केंद्रावरील विजय ही निवडणुकीची खरी परीक्षा आहे."

namo-organiser-in2

भाजयुमोला संबोधित करताना नरेंद्र मोदी

त्याच भाषणात ते म्हणाले की पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदाच्या आणि दुःखाच्या काळात जनतेबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहायला हवे आणि त्यांच्याशी वैयक्तिक संबंध विकसित करायला हवेत.

आज, जग नरेंद्र मोदी यांना धडाडीचा विकास पुरुष म्हणून पाहते , ज्यांनी त्यांच्या गुजरात राज्याचा कायापालट केला. सक्षम व्यक्तिमत्वअसलेला उत्कृष्ट संघटक अशी ओळख मिळण्यापूर्वी त्यांनी ज्या-ज्या क्षेत्रात काम केले तिथे तिथे त्यांनी भाजपासाठी यशोगाथा रचली.

namo-organiser-in3

नरेंद्र मोदी - सक्षम व्यक्तिमत्व असलेला माणूस

आलिशान कार्यालयात बसलेले आणि सभोवताली भारत आणि जगभरातून आलेले कुणाचे कोण, असा माणूस पाहण्याची सवय असताना, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नरेंद्र मोदी यांनी पहिले काम अहमदाबादमधिल रा.स्व.संघाच्या मुख्यालयात झाडू मारण्याचे केले.

सकाळी दूध आणणे आणि कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवणे हे त्यांचे काम होते. आदरापोटी, ते ज्येष्ठ प्रचारकांचे कपडे देखील धुवायचे.

निवडणूक राजकारणापासून दूर राहण्याची त्यांची वृत्ती असूनही संघ नेतृत्वाने त्यांना १९८७ मध्ये सरचिटणीस म्हणून भाजपात सामील व्हायला सांगितले. त्यानंतर, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक ते निवडणुका जिंकत गेले आणि अन्य लोकांना भाजपासाठी निवडणूक जिंकण्यासाठी मदतही केली.

महानगरपालिका निवडणूक:

१९८७ मध्ये भाजपात प्रवेश केल्यानंतर, नरेंद्र मोदींची पहिली सत्वपरीक्षा होती ती त्याच वर्षी होणारी अहमदाबादमधील महानगरपालिका निवडणूक. १९८०च्या सुरुवातीपासून भाजपने राजकोट आणि जुनागढ महानगरपालिकांमध्ये यश चाखले होते आणि विधानसभेच्याही काही जागा जिंकल्या होत्या मात्र राज्यात पाय रोवण्यासाठी पक्षासाठी अहमदाबाद महानगरपालिका जिंकणे आवश्यक होते. संसद, विधानसभा आणि गुजरातमधील जवळपास प्रत्येक पंचायत/महामंडळात काँग्रेसची सत्ता असूनही ते बदनाम होते मात्र त्यांच्या चाणाक्ष डावपेचांमुळे त्यांना हरवणे कठीण होते.

हे आव्हान स्वीकारून, नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण शहर पालथे घातले आणि भाजपाच्या विजयासाठी अथक परिश्रम घेतले. शेवटी, भाजपाला हवे तसे निकाल लागले. अहमदाबाद महानगरपालिकेत भाजपा सत्ताधारी पक्ष बनला आणि जनतेची सेवा करण्याची आणि आगामी काळात आपला पाया विस्तारण्याची संधी मिळाली.

२००० पर्यंत अहमदाबाद महानगर[पालिकेत भाजपाचे वर्चस्व राहिले. उपरोधिकपणे, १९८७ नंतरची ही पहिली महानगरपालिका निवडणूक होती जेव्हा मोदी गुजरातमध्ये नव्हते आणि दुसरीकडे काम करत होते.

विधानसभेतील यश : गांधीनगरमध्ये कमळ चमकले

माधवसिंह सोळंकी आणि त्यांच्या खाम आघाडीच्या नेतृत्वाखाली, १९८० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ५१.०४ टक्के मताधिक्यासह १४१ जागा जिंकल्या. भाजपाला केवळ ९ जागा मिळाल्या.

नवीन सामाजिक आघाडीच्या यशावर आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन सोळंकींप्रणित काँग्रेसने १४९ जागा आणि ५५.५५ टक्के मते मिळवून मोठा विजय मिळवला. भाजपासाठी हा पुन्हा एकदा निराशा करणारा निकाल होता. पक्षाला ११ जागा आणि १४. ९६ टक्के मतावर समाधान मानावे लागले.

मात्र, काँग्रेसकडे कोणतेही ठोस धोरण नव्हते आणि ते आरक्षणाभोवती राजकारण खेळत राहिले आणि सामाजिक आघाडी बनवत/ बिघडवत राहिले. १९८५ ते १९८८ दरम्यानच्या काळात भीषण दुष्काळ पडला. अनेक बॉम्बस्फोटांनी गुजरातचा सामाजिक बुरखा फाडला गेला.

namo-organiser-in4

१९९० मध्ये नरेंद्र मोदी यांचे गुजरातमध्ये स्वागत

१९९०च्या विधानसभा जशा जवळ आल्या, काँग्रेसविरोधी कल स्पष्ट जाणवत होता मात्र पक्षाचे डावपेच सुरूच होते. नरेंद्र मोदी यांना त्यांचे काम नेमून देण्यात आले- जनतेकडून बहुमत मिळवण्यासाठी पक्षाच्या राजकीय नेतृत्वाला पूरक अशी मजबूत संघटना उभी करणे.

काँग्रेस राजवटीनंतर दहा वर्षांनी २७ फेब्रुवारी १९९० रोजी, गुजरातने नवीन विधानसभा निवडली. चिमणभाई यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाने ७० जागा आणि २९.३६ टक्के मते मिळवली. ६७ जागा आणि २६.६९ टक्के मतांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ज्या पक्षाकडे नाममात्र अस्तित्व होते तो भाजपा मोठी शक्ती म्हणून उदयाला आला

namo-organiser-in5

१९९० मध्ये नरेंद्र मोदी, केशूभाई पटेल आणि अन्य नेते एल.के.अडवाणी यांचे भाषण ऐकताना

नरेंद्र मोदी राज्यात एक संघटक म्हणून अतिशय सक्रिय असताना गुजरात भाजपाने सामना केलेली दुसरी होती १९९५ च्या विधानसभा निवडणुका. १९९५ च्या निवडणुकीत भाजपाने प्रथमच विधासभेच्या सर्वच्या सर्व १८२ जागा लढवल्या. प्रथमच त्यांनी काँग्रेसपेक्षा जास्त जागा लढवल्या. गुजरातच्या जनतेने भाजपाला मोठा विजय मिळवून दिला, त्यांनी १२१ जागा जिंकल्या. भाजपाची मतांची टक्केवारी ४२. ५१ % वर गेली. काँग्रेससाठी ही निवडणूक निराशाजनक ठरली आणि त्यांना केवळ ४५ जागाच जिंकता आल्या. नरेंद्र मोदी यांनी यशस्वीपणे संघटना बळकट केली आणि काँग्रेसमधील अनेक उणिवा समोर आणल्या.

भाजपाने सरकार स्थापन केले मात्र समस्या सुटल्या नाहीत. गुजरातमध्ये भाजपा नेत्यांमध्ये अंतर्गत दुफळी माजली होती आणि शेवटी १९९६ मध्ये पक्षाची सत्तेवरची पकड ढिली झाली. त्यावेळेस नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या स्वतःच्या नेत्यांच्या विश्वासघातामुळे ज्यांनी पक्षातून फुटून अन्य पक्ष स्थापन केला आणि १९९६ मध्ये काँग्रेसशी हातमिळवणी केली. तरीही १९९८ मध्ये भाजपा पुन्हा सत्तेवर आला परंतु २००१ मध्ये पुन्हा काळोखाची छाया पसरली. पूर, चक्रीवादळ, दुष्काळ आणि कच्छ मधील विनाशकारी भूकंप यासारख्या सलग आलेल्या नैसर्गिक संकटाना खराब मदत कार्याची साथ लाभली ज्यामुळे भाजपापासून लोक दुरावले. सहकार्य क्षेत्रात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या कसोटीच्या काळात, नरेंद्र मोदी यांना ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री बनायला सांगण्यात आले. ज्या माणसाने कधीही सत्तेचे स्वप्न पहिले नव्हते त्यांच्याकडे गुजरातमध्ये भाजपा सरकारची प्रतिष्ठा पुन्हा वाढवण्यासाठी ही जबाबदारी सोपवण्यात आली. मार्च २००३ मध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याकडे पुन्हा एकदा मोठे काम सोपवण्यात आले.

गोध्रा आणि गुजरातमधील अन्य भागातील दुर्दैवी घटनांमुळे नरेंद्र मोदी यांची खात्री पटली की राज्याला विकास प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवीन सरकारची गरज आहे. त्यांची खात्री पटली की भाजपाच केवळ हे करू शकेल. म्हणूनच त्यांनी मुदतीपूर्वी विधानसभा विसर्जित केली आणि डिसेंबर २००२ मध्ये निवडणूका जाहीर झाल्या.

प्रचारादरम्यान, नरेंद्र मोदी भारतीय राजकारणातील अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व बनले. राजकीय पंडितांनी त्यांचा उपहास केला आणि मतदानोत्तर चाचण्यांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. त्यांनी प्रचारासाठी मेहनत घेतली मात्र आधीपेक्षा विपरीत घडले, ते प्रचाराचा चेहरा होते, लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी अवलंबलेले हे धोरण होते. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला आणि आशेचा संदेश पसरवला.

परिणामस्वरूप, भाजपाला मोठा विजय मिळाला, त्यांनी १२७ जागा जिंकल्या मतांची टक्केवारी ४९.८५ % होती. काँग्रेसला केवळ ५१ जागा मिळाल्या.

२००२-२००७ दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे सरकार स्वच्छ आणि विकासाभिमुख राहील याकडे लक्ष दिले आणि राज्याने अभूतपूर्व विकास केला. गुजरातमध्ये जसजसा अधिकाधीक विकास होत गेला , तसतसे विरोधकांमध्ये नैराश्य येत गेले. २००७ मध्ये, विधानसभा निवडणूक तोंडावर असताना , पुन्हा एकदा नरेंद्र मोदी वैयक्तिक निंदेचे लक्ष्य बनले. काँग्रेस अध्यक्षांनी कडवट प्रचारादरम्यान त्यांना "मृत्यूचे व्यापारी" असे संबोधले. तरीही नरेंद्र मोदी द्वेषाधारित राजकारणापासून दूर राहिले आणि आपल्या सामर्थ्यावर आणि विकास कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केले. अंतिमतः, भाजपाने ११७ जागा जिंकल्या आणि ४९.१२ % मते कायम ठेवली. काँग्रेसला ५९ जागांवर समाधान मानावे लागले.

namo-organiser-in6

https://www.narendramodi.in/360/build.html

नरेंद्र मोदी यांचा सर्वात अलिकडचा गुजरातमधील निवडणुकीतील विजय डिसेंबर २०१२ मध्ये होता, जेव्हा पक्ष ११५ जागांसह विजयी ठरला. गुजरातच्या जनतेने त्यांना मोठा विजय मिळवून दिला.

२००१ ते आतापर्यंत , नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना भाजपाने पंचायत आणि महानगरपालिकेची प्रत्येक निवडणूक जिंकली.

१९९० ते २०१२ या काळात, खूप काही बदलले परंतु जे कायम राहिले ते होते नरेंद्र मोदी यांचे कठोर परिश्रम, निग्रह आणि समर्पण , त्यांनी प्रत्येक प्रचारात अभिनव प्रयोग केले आणि भाजपाच्या बाजूने जनादेश मिळेल हे पाहिले.

लोकसभा निवडणुका : दिल्लीला गुजरातमधून सर्वाधिक कमळे

एक संघटक म्हणून नरेंद्र मोदी यांच्या क्षमतेने पक्षाला लागोपाठच्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरामधून सर्वाधिक भाजपा खासदार दिल्लीला पाठवण्यास मदत केली. १९८४ मध्ये, भाजपाने गुजरातमधून एकच जागा जिंकली होती मात्र ५ वर्षांनंतर १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाला १२ जागा मिळाल्या आणि १९९१ मध्ये हा आकडा २० वर गेला.

१९९६,१९९८ आणि १९९९ मध्ये भाजपाने गुजरातमध्ये २० पेक्षा अधिक जागा जिंकल्या. या काळात ते गुजरातमध्ये नव्हते तरीही , या विजयाचा पाया नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांनी रचला होता. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना , भाजपाने २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधून बहुतांश जागा जिंकल्या.

यात्रा : स्वतःपेक्षा देश मोठा

गुजरातमध्ये सरचिटणीस म्हणून १९८७ मध्ये न्याय यात्रा आणि १९८९ मध्ये लोक शक्ती यात्रा आयोजित करण्यात , नरेंद्र मोदी यांचा मोलाचा वाटा होता. या दोन्ही यात्रा काँग्रेसच्या दडपशाही आणि भ्रष्ट राजवटीत गुजरातच्या जनतेसाठी न्याय मिळवून देण्यात केंद्रस्थानी ठरल्या.

namo-organiser-in7

१९९१ मध्ये एकता यात्रेच्या आयोजनादरम्यान नरेंद्र मोदी आणि मुरली मनोहर जोशी

राष्ट्रीय स्तरावर, एल.के. अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ ते अयोध्या यात्रा आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली एकता यात्रा आयोजन करण्यात नरेंद्र मोदी केंद्रस्थानी होते. दहशतवादी श्रीनगर येथे तिरंगा फडकावण्यास अटकाव करून काश्मीर मध्ये दोलायमान स्थिती निर्माण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर एकता यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी, नरेंद्र मोदी यांनी स्वतः सर्व ठिकाणांची पाहणी केली होती..

namo-organiser-in8

एल.के.अडवाणी यांच्या जनादेश यात्रेत नरेंद्र मोदींचा सहभाग

namo-organiser-in9

एल.के. अडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या यात्रा

यात्रांचे आयोजन करणे हे कधीही सोपे काम नसते. यात्रा सुरळीत व्हावी यासाठी मार्ग ठरवण्यापासून ते प्रत्येक ठिकाणची तयारी तपासण्यापर्यंत , प्रत्येक गोष्ट पाहणे हे आयोजकाचे काम असते. त्या काळात नरेंद्र मोदी यांनी हि भूमिका योग्य रीतीने पार पाडली. मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी अनेक यात्रा काढल्या,सर्वात अलिकडची २०१२ मधील विवेकानंद युवा विकास यात्रा , ज्यात ते गुजरातभर फिरले आणि जनतेमध्ये स्वामी विवेकानंद यांचा संदेश पसरवला.

namo-organiser-in10

नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद युवा विकास यात्रेचा प्रारंभ केला

गुजरातच्या पलीकडे : उत्तर भारतात यश

१९९५ मध्ये नरेंद्र मोदी यांना भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून दिल्लीला पाठवण्यात आले. त्यांच्याकडे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा या उत्तरेकडील राज्यांची आणि चंदिगढ या केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली. या सर्व राज्यांमध्ये भाजपाची स्थिती कमकुवत होती. जम्मू आणि काश्मीर व पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये १५ वर्षे प्रक्षुब्ध वातावरण होते. १९८७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांमध्ये तफावत होती तर १९९२ मध्ये पंजाबमधील निवडणुकांवर विरोधकांनी बहिष्कार घातला. हरियाणा काँग्रेसकडे होते तर हिमाचल प्रदेशात १९९३च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची दाणादाण उडवण्यात आली.

namo-organiser-in11

१९९२ मध्ये श्रीनगर येथे भारतीय ध्वज फडकवताना नरेंद्र मोदी.

इथे पुन्हा नरेंद्र मोदी यांचे संघटनात्मक कौशल्य कामी आले. हरियाणा मध्ये जेव्हा १९९६च्या मध्याला निवडणुका झाली, तेव्हा भाजपाने बन्सी लाल यांच्या हरियाणा विकास पार्टीशी आघाडी केली आणि ४४ जागांसह आघाडीने सरकार स्थापन केले. बन्सी लाल मुख्यमंत्री बनले. भाजपाने २५ पैकी ११ जागा जिंकल्या. १९९१शी याची तुलना केली तर तेव्हा पक्षाने ९० पैकी ८९ जागा लढवल्या होत्या आणि केवळ २ जागा जिंकल्या होत्या. दशकभरापूर्वी, बन्सीलाल आणि देवीलाल यांच्याबरोबर आघाडी करण्याबाबत भाजपा कल्पनाच करू शकला नसता मात्र अफाट व्यवहार चातुर्य आणि पक्षाच्या तत्वांशी तडजोड न करता ही आघाडी वास्तवात आली.

जम्मू आणि काश्मीर मधील परिस्थिती जटिल होती- १९८७ च्या निवडणुका वादग्रस्त परिस्थितीत पार पडल्या. १९९० पासून काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती. १९९६ मध्ये जेव्हा लोकांकडे हे राज्य गेले, तेव्हा त्यांनी फारूक अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फेरंसला ८७ जागांपैकी ५७ जागासह जनादेश दिला. दुसऱ्या क्रमांकाच्या जागा भाजपाला मिळाल्या. जरी त्यांना ८ जागा मिळाल्या असल्या तरी पक्षासाठी तो विजय होता कारण पक्षाने काँग्रेस किंवा जनता दल सारख्या पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या.

नरेंद्र मोदी यांच्याकडे दिलेल्या हिमाचल प्रदेश या दुसऱ्या राज्यात वेगळी राजकीय स्थिती होती. १९९० मध्ये एकूण ६८ जागांपैकी ४६ जागा जिंकून भाजपाने सरकार स्थापन केले होते, मात्र १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याचा पार्श्वभूमीवर सरकारला सत्ता गमवावी लागली. १९९३ मध्ये जेव्हा राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या, भाजपाचा दारुण पराभव झाला आणि केवळ ८ जागाच जिंकता आल्या. १९९८ मध्ये, भाजपा आणि काँग्रेस दोघांनी ३१ जागा जिंकल्या आणि माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्या हिमाचल विकास काँग्रेसचे ५ आमदार असल्यामुळे सत्तेचे पारडे अधांतरी राहिले. सुखराम यांच्यावर कुरघोडी करण्यात नरेंद्र मोदी यांनी प्रभावी भूमिका बजावली आणि प्रेम कुमार धुमाळ या नवीन चेहऱ्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. २००७ मध्ये स्पष्ट बहुमतासह धुमाळ पुन्हा एकदा पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री बनले.

पंजाबमधील यश अभूतपूर्व असे होते , तिथे १९९७ च्या विधानसभा निवडणुकीत अकाली-भाजपा युतीने ११७ पैकी ९३ जागा जिंकून सत्ता काबीज केली. भाजपाने २२ जागा लढवल्या आणि १८ जिंकल्या, आणि लढवलेल्या जागांमध्ये त्यांची मतांची टक्केवारी ४८.२२% होती . एक वर्षांपूर्वी, १९९६ मध्ये चंदिगढ महापालिका निवडणुकीत मोदी यांनी भाजपाच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले आणि भाजपासाठी तीनचतुर्थांश बहुमत मिळवले. हा विजय लक्षणीय होता कारण चंदिगढ महापालिकेत काही सदस्य नायब राज्यपाल, ज्यांची नेमणूक बिगर-भाजपा सरकारने केली होती,त्यांनी नामनिर्देशित केलेले होते. नरेंद्र मोदी यांच्या चाणाक्ष नजरेमुळे पक्षाने १९९८ मध्ये चंदिगढची लोकसभेची जागा लढवण्यासाठी सत्यपाल जैन यांची निवड केली ,जेव्हा त्यांनी पवनकुमार बन्सल यांचा पराभव केला होता.

namo-organiser-in12

नरेंद्र मोदी आणि प्रकाश सिंग बादल

संसदीय निवडणुकांमध्ये संघटक म्हणून नरेंद्र मोदी यांची कामगिरी लक्षवेधी होती , त्यांना सहा वर्षात ३ लोकसभा निवडणुकींना सामोरे जावे लागले , जेव्हा ते गुजरातच्या बाहेर होते. या राज्यांचे प्रभारी म्हणून पहिल्या निवडणुकीत, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने एक जागा, हरयाणामध्ये चार जागा जिंकल्या तर पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये त्यांची पाटी कोरी राहिली. मात्र, १९९९ मध्ये, जम्मू-काश्मीरने २ खासदार, हिमाचल प्रदेशने ३, पंजाबने १ आणि हरियाणाने ५ खासदार दिले.

namo-organiser-in13

१९९८ मध्ये श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा शपथविधी समारंभ

१९९८ मध्ये नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय सरचिटणीस(संघटना) बनवण्यात आले. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत सरचिटणीस(संघटना) हे खूप महत्वाचे पद आहे, ज्यामध्ये संपूर्ण देशभरातील बाबींचा समन्वय साधावा लागतो.

यापूर्वी कुशाभाऊ ठाकरे आणि सुंदर सिंग भंडारी यांनी हे पद भूषवले होते. १९९९ मध्ये जेव्हा भाजपाने सर्वाधिक १८२ लोकसभेच्या जागा जिंकल्या तेव्हा ते संघटनेचे सरचिटणीस होते.

जून २०१३ मध्ये, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी आणि १३ सप्टेंबर २०१३ रोजी रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव घोषित करण्यात आले

namo-organiser-in14

नरेंद्र मोदी यांना रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले.

कार्यालय परिसर स्वच्छ करण्यापासून, पंचायती ते संसदेसाठी निवडणूक प्रचाराचा एक भाग असताना, पक्ष संघटनेसाठी काय करावे लागते याचा त्यांना अनुभव आला होता. आणि , ज्या गोष्टीला त्यांनी स्पर्श केला त्याला यश मिळाले! यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाहीकी ते भाजपाचे सक्षम व्यक्तिमत्व आहेत.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींचे हृद्य पत्र
December 03, 2024

दिव्यांग कलाकार दिया गोसाईसाठी, सर्जनशीलतेचा क्षण आयुष्य बदलणारा अनुभव ठरला. 29 ऑक्टोबर रोजी बडोद्यात पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू असताना, तिने रेखाटलेली त्यांची आणि स्पेन सरकारचे अध्यक्ष महामहीम. श्री. पेड्रो सांचेझ यांची रेखाचित्रे त्यांना भेट दिली. तिने अत्यंत मनापासून दिलेली ही भेट स्वीकारण्यासाठी दोन्ही नेते वाहनातून उतरून जातीने तिच्याजवळ त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

काही आठवड्यांनंतर, 6 नोव्हेंबर रोजी, दियाला तिच्या कलाकृतीची प्रशंसा करणारे पंतप्रधानांचे पत्र आले, त्यामध्ये त्यांनी महामहीम. श्री. सांचेझ यांनीही त्याचे कौतुक केल्याचे देखील कळवले होते. पीएम मोदींनी तिला ललित कलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याचे शिक्षण घेण्याच्या आवाहनाबरोबरच "विकसित भारत" घडवण्यातील तरुणांच्या भूमिकेवर विश्वासही व्यक्त केला होता. त्या पत्राला त्यांनी खास आपल्या पद्धतीची जोड देत तिच्या कुटुंबियांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या होत्या.

या पत्रामुळे आनंदाने भारावून, दियाने तिच्या पालकांना पत्र वाचून दाखवले असता तिने आपल्या कुटुंबाला इतका मोठा बहुमान मिळवून दिल्याचा त्यांनाही आनंद झाला. " आपल्या देशाचा एक छोटासा भाग असल्याचा मला अभिमान आहे. मोदीजी, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला दिल्याबद्दल धन्यवाद," असे म्हणत दियाने पंतप्रधानांच्या पत्रामुळे आपल्याला जीवनात धाडसी पावले उचलण्याची आणि इतरांनाही अशा प्रकारे सक्षम बनविण्याची प्रेरणा मिळाली, असेही नमूद केले.

पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून दिव्यांगांना सक्षम बनविण्याची आणि त्यांच्या योगदानाची यथोचित दखल घेण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते. सुगम्य भारत अभियानासारख्या अनेक उपक्रमांपासून ते दिया सारखीशी वैयक्तिक नाते प्रस्थापित करण्यापर्यंत, ते सातत्याने प्रेरणा देण्याचा आणि त्यांना वर आणण्याचे काम करून, प्रत्येक प्रयत्न चांगल्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध करत आहेत .