Quoteपंतप्रधानांनी तरुणांशी मनापासून आणि मुक्तपणे संवाद साधला
Quoteपंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर आणि त्यातून आपण काय शिकू शकतो यावर चर्चा केली
Quoteऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागले आणि त्यांनी या आव्हानांवर कशी मात केली हे जाणून घेण्यासाठी तरुणांनी त्यांचे आत्मचरित्र वाचण्याचा पंतप्रधानांनी दिला सल्ला
Quoteपंतप्रधानांना भेटण्याची आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात बसण्याची अनोखी संधी मिळाल्याबद्दल तरुणांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस  यांना आदरांजली म्हणून आयोजित सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या तरुणांशी ‘तुमच्या नेत्याबद्दल जाणून घ्या’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. 7, लोककल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी हा संवाद झाला.

|

पंतप्रधानांनी तरुणांशी मनापासून  आणि मोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाचे विविध पैलू आणि त्यांतून  आपण काय शिकू शकतो यावर चर्चा केली. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या आयुष्यात  कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागले आणि त्यांनी या आव्हानांवर कशी मात केली हे जाणून घेण्यासाठी तरुणांनी त्यांची आत्मचरित्र वाचण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

|

देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याची आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात  बसण्याची अनोखी संधी मिळाल्याबद्दल युवकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक व्यक्तींना भेटून  विविधतेत एकता म्हणजे काय हे समजल्याचे युवकांनी सांगितले.

|

भूतकाळातला हा एक स्वागतार्ह बदल आहे, यापूर्वी केवळ मान्यवरांना संसदेत राष्ट्रीय व्यक्तिमत्वांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आमंत्रित केले जात होते, मात्र देशभरातील या  80 युवकांना  नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी संसदेत आयोजित पुष्पांजली अर्पण कार्यक्रमासाठी  निवडण्यात आले. 'तुमच्या नेत्याला जाणून घ्या' कार्यक्रमांतर्गत त्यांची निवड करण्यात आली आहे, ज्यात संसदेत होणार्‍या पुष्पांजली सोहळ्याचा उपयोग महान राष्ट्रीय व्यक्तिमत्वांची  माहिती आणि योगदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून करण्यात आला आहे. दीक्षा (DIKSHA) पोर्टल आणि माय गव्ह (MyGov) वरील प्रश्नमंजुषा; जिल्हा आणि राज्य स्तरावर वक्तृत्व/भाषण स्पर्धा; आणि नेताजींचे जीवन आणि योगदान यावरील आंतर विद्यापीठ स्पर्धेसह विस्तृत, वस्तुनिष्ठ आणि गुणवत्तेवर आधारित प्रक्रियेद्वारे त्यांची निवड करण्यात आली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पुष्पांजली समारंभात 31 जणांना नेताजींच्या योगदानाबद्दल  बोलण्याची संधीही मिळाली . ते हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मराठी आणि बांगला या पाच भाषांमध्ये बोलले.

|
  • ganesh joshi April 30, 2023

    🌹🕉️ श्री स्वामी समर्थ 🕉️🌹 🌼 भारत सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य पं. आचार्य श्री गाणेशजी जोशी (कुंडली तज्ञ वास्तुतज्ञ ज्योतिष विशारद आणी रत्न पारखी )🌼 🙏मिळवा आपल्या प्रत्येक समस्येचे समाधान घरच्या घरी आपल्या एका फोन कॉल द्वारा.☎️7350050583 समस्या ती कोणतीही असो जसे की, 💋प्रेम विवाह, 🏌️नोकरी प्रमोशन, 💯शिक्षण, आर्थिक अडचण, 💎 व्यापारहानी,🙏 राजकारण,👪पती-पत्नीत वाद विवाद, 🤰संतान सुख, 🧔गुप्त शत्रु, 👩‍❤️‍👨गृह क्लेश, 🪐विदेश भ्रमण, करिअर सल्ला व मार्गदर्शन, 🧭कुंडलीतील ग्रह दोष, 🏡वास्तुदोष, 👽बाहेरील बाधा, 🌹वशीकरण अशा प्रत्येक समस्यांचे खात्रीशीर मार्गदर्शन व 💯%योग्य उपाय शास्त्रोक्त पद्धतीने करून मिळेल. 🧭 आपल्या जन्म कुंडली विश्लेषण याकरिता आपली जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मस्थळ 🕉️ गुरुजींना️~☎️7350050583व्हाट्सअप करून आपल्याला मार्गदर्शनाची वेळ निश्चित करून घ्यावी. 🙏संपर्क करण्याची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7पर्यंत. 🙏🙏 ज्यांची श्रद्धा व भक्ति असेल त्यांनी अवश्य कॉल करावा. 🙏 माता-भगिनी सुद्धा निशंक कॉल करून आपली समस्या कळवू शकतात. 🙏 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 🙏 🌼
  • Ramamurthy Avasarala February 18, 2023

    It’s very necessary the younger generation to know the history and the legends of nation like Vivekanand who has taken the values of our nation to the world Sardar vallabhai patel the then home minster after independence Vajpayeeji our royal Prmeminister so many legends
  • Yogesh Chandra Srivastava February 02, 2023

    बहुत बहुत शुभकामनाएं ❤️🙏🙏🙏❤️
  • Vksp February 01, 2023

    जय श्री राम
  • Raju c k January 30, 2023

    namo narayana
  • Mohan singh Dharmraj January 26, 2023

    🇮🇳 भावनात्मक सम्मान से बडा कोई सम्मान नहीं, और उसकी आपके पास कमी नहीं🙏🙏हर हर मोदी🚩💐💐
  • T S KARTHIK January 26, 2023

    hockey Deccan Chronicle Chennai 26 January 2023
  • pmramakanth January 26, 2023

    pmramakanth
  • Geeta gupta January 26, 2023

    namo narayana 🇮🇳🌷
  • Atul Kumar Mishra January 26, 2023

    नमो
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'Operation Brahma': First Responder India Ships Medicines, Food To Earthquake-Hit Myanmar

Media Coverage

'Operation Brahma': First Responder India Ships Medicines, Food To Earthquake-Hit Myanmar
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 मार्च 2025
March 30, 2025

Citizens Appreciate Economic Surge: India Soars with PM Modi’s Leadership