पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12 वाजता आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, जनपथ, नवी दिल्ली येथून ‘उत्कल केसरी’ डॉ. हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओदिशा इतिहास’ पुस्तकाचा हिंदी अनुवाद प्रकाशित करतील. ओडिया आणि इंग्रजी भाषेत आतापर्यंत उपलब्ध असलेल्या या पुस्तकाचे हिंदी भाषांतर शंकरलाल पुरोहित यांनी केले आहे . केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भर्तृहरी महताब खासदार (लोकसभा ), कटक हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. हिंदी आवृत्ती प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन हरेकृष्ण महताब फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
लेखकाबद्दल
डॉ. हरेकृष्ण महताब हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व होते. 1946 ते 1950 आणि 1956 ते 1961 या काळात त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. अहमदनगर फोर्ट कारागृहात त्यांनी ‘ओदिशा इतिहास’ हे पुस्तक लिहिले, तेथे 1942-1945 दरम्यान दोन वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी तुरूंगवास भोगला होता.