पंतप्रधान म्हणून नेमणूक झाल्यापासूनच नरेंद्र मोदी यांनी व्हीआयपी संस्कृती संपविण्यावर भर दिला आहे, ज्या संस्कृतीने अनेक दशकांपासून देशाला त्रास दिला आहे. आपल्या शक्तिशाली शब्दांद्वारे आणि कृतींद्वारे त्यांनी दाखवून दिले आहे की सर्व नागरिक समान आहेत आणि देशामध्ये कोणत्याही भेदभावासाठी जागा नाही.
‘न्यू इंडिया’ मध्ये व्हीआयपी नाही केवळ इपीआय (एव्हरी परसन इज इम्पॉर्टन्ट) हेच मुलतत्व असेल असे पंतप्रधानांनी म्हटले.
10 मार्च 2019 रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) 50 व्या स्थापनादिनी केलेल्या भाषणात त्यांनी यावर विस्तृत भाष्य केले.
मोकळेपणाने बोलताना पंतप्रधान मोदींनी; ते भाजपचे कार्यकर्ते असताना एकदा विमानतळावर आपल्या सहकार्याची सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा तपासणी केल्यामुळे त्या सहकार्याला आलेला राग त्यांनी कसा शांत केला याबद्दलचा एक अनुभव सांगितला
त्यांनी सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आणि त्यांना सांगितले की कोणाच्याही दबावाशिवाय त्यांनी आपले काम केले पाहिजे आणि देशाचे संरक्षण केले पाहिजे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य बजावण्यात राजकीय नेतेच मोठा अडथळा आहेत.
त्यांच्या या बोलण्यावर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले.
पंतप्रधान मोदींनी काय म्हटले ते इथे बघा :