पंतप्रधान म्हणून नेमणूक झाल्यापासूनच नरेंद्र मोदी यांनी व्हीआयपी संस्कृती संपविण्यावर भर दिला आहेज्या संस्कृतीने अनेक दशकांपासून देशाला त्रास दिला आहे. आपल्या शक्तिशाली शब्दांद्वारे आणि कृतींद्वारे त्यांनी दाखवून दिले आहे की सर्व नागरिक समान आहेत आणि देशामध्ये कोणत्याही भेदभावासाठी जागा नाही.

‘न्यू इंडिया’ मध्ये व्हीआयपी नाही केवळ इपीआय (एव्हरी परसन इज इम्पॉर्टन्ट) हेच मुलतत्व असेल असे पंतप्रधानांनी म्हटले.

 10 मार्च 2019 रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ 50 व्या स्थापनादिनी केलेल्या भाषणात त्यांनी यावर विस्तृत भाष्य केले.

मोकळेपणाने बोलताना पंतप्रधान मोदींनी; ते भाजपचे कार्यकर्ते असताना एकदा विमानतळावर आपल्या सहकार्याची सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा तपासणी केल्यामुळे त्या सहकार्याला आलेला राग त्यांनी कसा शांत केला याबद्दलचा एक अनुभव सांगितला

त्यांनी सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आणि त्यांना सांगितले की कोणाच्याही दबावाशिवाय त्यांनी आपले काम केले पाहिजे आणि देशाचे संरक्षण केले पाहिजे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य बजावण्यात राजकीय नेतेच मोठा अडथळा आहेत.

त्यांच्या या बोलण्यावर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटले ते इथे बघा :

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry

Media Coverage

Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींचे हृद्य पत्र
December 03, 2024

दिव्यांग कलाकार दिया गोसाईसाठी, सर्जनशीलतेचा क्षण आयुष्य बदलणारा अनुभव ठरला. 29 ऑक्टोबर रोजी बडोद्यात पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू असताना, तिने रेखाटलेली त्यांची आणि स्पेन सरकारचे अध्यक्ष महामहीम. श्री. पेड्रो सांचेझ यांची रेखाचित्रे त्यांना भेट दिली. तिने अत्यंत मनापासून दिलेली ही भेट स्वीकारण्यासाठी दोन्ही नेते वाहनातून उतरून जातीने तिच्याजवळ त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

काही आठवड्यांनंतर, 6 नोव्हेंबर रोजी, दियाला तिच्या कलाकृतीची प्रशंसा करणारे पंतप्रधानांचे पत्र आले, त्यामध्ये त्यांनी महामहीम. श्री. सांचेझ यांनीही त्याचे कौतुक केल्याचे देखील कळवले होते. पीएम मोदींनी तिला ललित कलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याचे शिक्षण घेण्याच्या आवाहनाबरोबरच "विकसित भारत" घडवण्यातील तरुणांच्या भूमिकेवर विश्वासही व्यक्त केला होता. त्या पत्राला त्यांनी खास आपल्या पद्धतीची जोड देत तिच्या कुटुंबियांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या होत्या.

या पत्रामुळे आनंदाने भारावून, दियाने तिच्या पालकांना पत्र वाचून दाखवले असता तिने आपल्या कुटुंबाला इतका मोठा बहुमान मिळवून दिल्याचा त्यांनाही आनंद झाला. " आपल्या देशाचा एक छोटासा भाग असल्याचा मला अभिमान आहे. मोदीजी, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला दिल्याबद्दल धन्यवाद," असे म्हणत दियाने पंतप्रधानांच्या पत्रामुळे आपल्याला जीवनात धाडसी पावले उचलण्याची आणि इतरांनाही अशा प्रकारे सक्षम बनविण्याची प्रेरणा मिळाली, असेही नमूद केले.

पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून दिव्यांगांना सक्षम बनविण्याची आणि त्यांच्या योगदानाची यथोचित दखल घेण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते. सुगम्य भारत अभियानासारख्या अनेक उपक्रमांपासून ते दिया सारखीशी वैयक्तिक नाते प्रस्थापित करण्यापर्यंत, ते सातत्याने प्रेरणा देण्याचा आणि त्यांना वर आणण्याचे काम करून, प्रत्येक प्रयत्न चांगल्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध करत आहेत .