डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाने भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजी-धन-व्यापारी योजना जाहीर केल्या आहेत. याद्वारे वैयक्तिक खर्चासाठी डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्याला बक्षीस दिलं जाणार आहे. डिजीटल व्यवहाराच्या क्षेत्रात गरीब, मध्यमवर्ग आणि लहान व्यापाऱ्यांना आणण्याच्या दृष्टीने या योजना आखण्यात आल्या आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत या योजनांची अंमलबजावणी होणार आहे.
25 डिसेंबर 2016च्या पहिल्या सोडतीद्वारे योजना कार्यान्वित होणार असून 14 एप्रिल 2017 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी महासोडत काढण्यात येणार आहे.
रोकडरहित व्यवहार करून व्यवहारातली पारदर्शकता वाढवण्याबरोबरच काळ्या पैशाला आळा घालण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनंही काही प्रोत्साहनपर सवलती काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या आहेत.