जी –20 देशांनी मजबूत आणि सक्रिय सहकार्याद्वारे, फरारी आर्थिक गुन्हेगारांशी व्यापक आणि कार्यक्षमतेने व्यवहार करणे.
· कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य, जसे की, गुन्हेगारी प्रक्रियेमध्ये आलेल्या संथगतीला परिणामकारक बनविणे, गुन्हेगारांकडून लवकरातलवकर आर्थिक गुन्ह्याची परतफेड तसेच गुन्हेगारांविरुद्ध त्वरीत कारवाईला प्रोत्साहन,आणि त्याच्या मूळ देशाला गुन्हेगार स्वाधीनकरणे.
· जी-20 देशांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे अशी यंत्रणा तयार करणे ज्याद्वारे आर्थिक गुन्हेगाराला कुठल्याही देशात प्रवेश आणि सुरक्षा मिळण्यास नकार मिळेल.
· संयुक्तराष्ट्रसंघाच्या भ्रष्टाचारविरोधीकराराच्या (यूएनसीएसी) तत्त्वांनुसार, संयुक्तराष्ट्रसंघाच्या राष्ट्राबाहेरील एकत्रित गुन्ह्याविरुद्ध विशेषतः आंतरराष्ट्रीय सहकार्यांशी संबंधित कराराची पूर्णतः आणि परिणामकारकरीत्या अंमलबजावणी करणे.
· फायनान्शिअल इंटेलिजन्सयुनिट (एफआईयू ) आणि सक्षमप्राधिकाऱ्यांदरम्यान योग्य वेळेत आणि व्यापक माहितीच्या आदान-प्रदानासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करण्याला एफ.ए.टी.एफने प्राधान्यता आणिलक्ष ठरवावे.
· भटक्या आर्थिकगुन्हेगारांची मानक परिभाषा तयार करण्यासाठी एफएटीएफने विशेष कार्य सोपवावे.
· एफएटीएफने आपल्या स्थानिक कायद्यानुसार, जी -20 देशांना मार्गदर्शन व सहाय्य प्रदानकरण्यासाठी भटकलेल्या आर्थिक गुन्हेगारांना हाताळण्यासाठी ओळख, प्रत्यावर्तना आणि न्यायिक कार्यवाही संबंधित सामान्यत: सर्वमान्य आणि प्रमाणित प्रक्रियांचा एक संच देखील विकसित केला पाहिजे.
· अनुभवाचे वाटप आणि प्रत्यावर्तन यशस्वी प्रकरणांसाठी, प्रत्यावर्तन आणि विद्यमान कायदेशीर सहाय्य इत्यादींसह उत्कृष्ट प्रथा सामायिक करण्यासाठी सामान्य मंच उपलब्ध करावा.
· जी-20 फोरमने अशा आर्थिक गुन्हेगारांची मालमत्ता शोधून काढावी ज्यांच्यावर त्याच्या स्वत:च्या देशांचे कररुपी कर्ज असून त्याची परतफेड करुन घ्यावी.