पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेने देशाचा किनारा कधीच ओलांडला आहे. त्यांची किर्ती साता समुद्रापार गेली आहे. अगदी अमेरिका ते ऑस्ट्रेलिया, चीन ते युरोप कोठेही गेलात तर मोदी यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांची कार्य करण्याची पद्धत याची चर्चा होतेच. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेचे त्यांनी ज्याप्रकारे यशस्वी आयोजन आणि व्यवस्थापन केले होते, त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा ‘उत्तम प्रशासक’ असा परिचय आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला. या शिखर परिषदेत शंभर पेक्षा जास्त देशांचे प्रमुख सहभागी झाले होते. या परिषदेची फलनिष्पत्ती आपल्या समोर आहेच. सहभागी झालेल्यांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आणि गुजरातच्या आर्थिक विकासाला हातभार लावला. कामधंद्यानिमित्त गुजरात सोडून बाहेर गेलेल्यांनाही मोदी यांनी आपल्या राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.दरवर्षी ‘प्रवासी भारतीय दिनी’ मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या व्यक्तीला वक्ता म्हणून बोलावले जाते. विशेष हा मान मोदी यांनाच मिळत आहे. कारण मोदी सातत्याने परदेशांना भेटी असतात. यामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, मॉरिशस, थायलंड आणि युगांडा यांचा समावेश आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ऑक्टोबर 2001 मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर महिनाभरात नरेंद्र मोदी रशिया भेटीवर गेले. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबरोबर जात असलेल्या शिष्टमंडळात त्यांचा सहभाग होता. यावेळी त्यांनी अॅस्ट्राकान प्रांताच्या गव्हर्नरांशी महत्वपूर्ण करार केला.
गुजरात आणि रशिया यांच्यातील संबंध दिवसेंदिवस दृढ होत गेले. मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी अनेक वेळा रशियाचा दौरा केला. आणि सहकार्याचे करार केले ऊर्जासारख्या महत्वाच्या क्षेत्रातही सांमजस्य करार केला.
इस्त्रायलला गेलेल्या उच्चस्तरीय शिष्ठमंडळामध्येही नरेंद्र मोदी यांचा सहभाग होता. आज इस्त्रायलच्या सहकार्याने गुजरातमध्ये अनेक क्षेत्रांचा विकास झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मनुष्यबळ विकास, कृषी, पाणी, ऊर्जा आणि सुरक्षा यांचा समावेश आहे.
दक्षिण-पूर्व अशिया आणि भारत यांच्यातील संबंध तर आता अधिकच मजबूत बनले आहेत. अनेक प्रसंगांच्या निमित्ताने मुख्यमंत्री या नात्याने मोदी यांनी याआधी दक्षिण-पूर्व अशियाला भेटी दिल्या आहेत. हॉन्ग-कॉंन्ग, मलेशिया, सिंगापूर, तैवान आणि थायलंड या देशांना त्यांनी वारंवार भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे या देशांनीही गुजरातमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवा सारख्या कार्यक्रमांना या देशांचे प्रतिनिधी गुजरातमध्ये येत असतात
नरेंद्र मोदी यांनी 2011 मध्ये चीन भेटीवर असताना ह्युआई इथल्या संशोधन आणि विकास केंद्राची पाहणी केली
चीनशी आर्थिक संबंध सुदृढ करून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या विकासासाठी एक नवे दालन उघडले. या भेटीत नरेंद्र मोदी यांचे चीनच्या ज्येष्ठ नेत्यांनी जोरदार स्वागत केले. साधारणपणे एखाद्या देशाच्या प्रमुखासाठी राखीव असलेल्या बीजिंगमधल्या ग्रेट हॉलमध्ये मोदी यांच्यासाठी स्वागत समारंभ आयोजण्यात आला होता. त्यांच्या या चीन भेटीमुळे गुजरातमध्ये मोठ्याप्रमाणावर चीनच्या कंपन्यांनी गुंतवणूक केली. तसेच त्यांनी यावेळी संशोधन आणि विकासा संदर्भात सामंजस्य करार केले.
नरेंद्र मोदी यांनी जुलै 2012मध्ये जपानला भेट दिली होती आणि तेथील वरिष्ठ नेत्यांशी महत्वपूर्ण चर्चा केली होती
गुजरातच्या आर्थिक विकासात जपान हा एक महत्वाचा भागिदार आहे. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेपासून जपानने सातत्याने गुजरातला पाठिंबा दिला आहे. जपानच्या मदतीने दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिका तयार होऊ श्शकली आणि यामुळे गुजरातचा आर्थिक चेहरामोहराच बदलून गेला. जपान आणि गुजरात यांच्यामध्ये संबंध अधिक मजबूत होण्यासही या मार्गिकेमुळे मदत झाली. 2012 मध्ये नरेंद्र मोदी यांनी जपानला भेट देवून जपानी मंत्र्यांशी चर्चा केली एवढेच नाही तर त्यांनी शिंन्झो अॅबे ( सध्याचे जपानचे पंतप्रधान आणि तत्कालीन विरोधी नेते) यांच्याशीही बोलणी केली. मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी दक्षिण कोरियाला भेट दिली होती आणि महत्वपूर्ण आर्थिक आणि सांस्कृतिक देवाण- घेवाणीचे करार करून गुजरातची प्रगती कशी साधता येईल, याचा विचार केला होता.
नरेंद्र मोदी शिन्झो अॅबे यांच्यासमवेत
पूर्व अफ्रिकेतील राजकीय अर्थकारणामध्ये गुजरातीचे महत्वपूर्ण योगदान आहे. अर्थात मोदी यांनी हे संबंध अधिक चांगल्या पद्धतीने जोपासलेही आहेत. त्यामुळे गुजरात आणि पूर्व अफ्रिका असे वेगळे नाते पाहायले मिळते. पूर्व अफ्रिकेत मोठ्या संख्येने गुजराती वास्तव्य करतात. केनिया, युगांडा या ठिकाणी मोदी यांचे खूप प्रेमाने, आनंदाने स्वागत करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने ज्या पद्धतीने प्रगती केली, विकास साधला ; त्यामुळे केनिया, युगांडाचे नेते खूप प्रभावित झाले. जानेवारी 2014 मध्ये मोदी यांना दक्षिण अफ्रिकेचे उच्च आयुक्त भेटण्यासाठी आले होते. महात्मा गांधी दक्षिण अफ्रिकेतून भारतात परतले या ऐतिहासिक घटनेला 2015मध्ये शंभर वर्षे होत आहेत, हे श्शतक साजरे करण्याविषयी मोदी यांनी केलेले नियोजन ऐकून ते खूपच प्रभावित झाले. (गांधीजी दक्षिण अफ्रिकेतून 1915 मध्ये भारतात परतले होते.)
नरेंद्र मोदी यांनी दक्षिण अफ्रिकेचे उच्च आयुक्त एफ. के. मोरूले यांची उच्चस्तरीय शिष्ठ मंडळासह जानेवारी 2014 मध्ये भेट घेतली.
नरेंद्र मोदी ज्यावेळी परदेशांना भेटी देतात, त्यावेळी तिथल्या अनेक भारतीयांना खूप आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतात. आपण स्वीत्झर्लंडला गेल्यानंतर दिवंगत स्वातंत्र सेनानी श्श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या रक्षेचा कलश आपण नक्की आणू, अशी ग्वाही त्यांनी वर्मा यांच्या कुटुंबियांना दिली होती. 50 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर त्यांनी स्वतः जिनेव्हाला भेट देवून वर्मा यांच्या रक्षेचा कलश आणला
स्वीत्झर्लंडमध्ये 2003 मध्ये श्यामजी वर्मा यांच्या रक्षेचा कलश स्वीकारताना मोदी
भारतीय हिरे व्यापार विरोधात असलेले खटले वेगाने निकालात काढावेत आणि त्यांची चीनच्या कारावासातून त्वरित मुक्तता करावी, अशी विनंती नरेंद्र मोदी यांनी चीनच्या उच्च अधिकाऱ्यांना 2011 मध्ये केली होती. त्यामुळे अनेक हिरे उद्योजकांची सुटका होऊ शकली आणि ते घरी येऊ शकले. जागतिक पातळीवर कोणत्याही नेत्याची चर्चा करताना नरेंद्र मोदी ‘इंडिया फर्स्ट’ या हेतूनेच ते विचार करतात. भारताच्या व्यूहरचनेला आणि अर्थकारणाला धक्का पोहोचेल, अशी कोणतीही कृती करण्यास ते मज्जाव करतात.
दक्षिण अशिया मध्येही नरेंद्र मोदी खूप लोकप्रिय आहेत. गुजरातच्या विकासाविषयी आपल्या संस्थेमध्ये त्यांनी मार्गदर्शन करावे यासाठी,‘कराची चेंबर ऑफ कॉमर्स अॅंड इंडस्ट्री’ यांनी मुख्यमंत्री मोदी यांना खास आमंत्रित केले होते.. ‘केसीसीआय’चा शिलान्यास 1934 मध्ये महात्मा गांधीजी यांच्या हस्ते झाला होता, या कार्यक्रमाची प्रतिकृती त्यांनी यावेळी भेट दिली. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांनीही नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि गुजरातमधील विकासाबद्दल बोलण्यासाठी निमंत्रित केले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात आणि युरोप यांच्यातील संबंधांनी नविन ऊँची गाठली. ग्रेट ब्रिटनचे उच्चायुक्त, फ्रान्सचे राजदूत, जर्मनी, इटली, स्वीत्झर्लंड, डेन्मार्क आणि स्वीडन या देशांच्या राजदुतांनीही 2012 आणि 2013 मध्ये मोदी यांची भेट घेतली होती. युरोपियन संघाच्या उच्चस्तरीय विधीज्ञांचीही मोदी यांनी भेटी घेतल्या होत्या. या सर्वांनी गुजरातने गेल्या दशकभरामध्ये केलेल्या प्रगतीचे खूप कौतुक केले
युरोपिय देशांच्या मते आर्थिक, सामाजिक आणि अगदी सांस्कृतिक दृष्ट्या गुजरात हे सर्वात आकृर्षक स्थान आहे, सर्व क्षेत्रात येथे संधी उपलब्ध आहेत, असे मत त्यांचे बनले आहे
नरेंद्र मोदी यांची कीर्ती अटालांटिकच्या पार गेली आहे. सप्टेंबर 2011मध्ये अमेरिकेच्या ‘कॉंग्रेसशनल रिसर्च सर्व्हिसने मोदी यांचे कौतुक करून त्यांना ‘किंग ऑफ गव्हर्नन्स’ असे संबोधन बहाल केले. मुख्यमंत्री मोदी यांच्या नेतृत्वखाली गुजरातने केलेली प्रगती म्हणजे परिणामकारी प्रशासन आणि प्रभावी विकासाचे उत्तम उदाहरण असून भारताला प्रगतिपथावर नेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, असे म्हटले आहे. आर्थिक प्रक्रियेला नेटकेपणाने स्थिरता आणणे अणि लाल फितीचा कारभार संपुष्टात आणणे, त्याचबरोबर भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी मोदी यांनी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे
मार्च 2012 मध्ये ‘‘मोदी मिन्स बिझनेस’ या शीर्षकाखाली एक खास मुखपृष्ठ लेख ‘टाईम’ या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठीत नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. ‘टाईम’ मुखपृष्ठावरही मोदी यांची छबी आहे. ‘टाईम’ मुखपृष्ठावर स्थान मिळवणारे भारतीय नेते आहेत, महात्मा गांधी, सरदार पटेल, लाल बहादूर शास्त्री आणि आचार्य विनोबा भावे. या सूचीमध्ये आता नरेंद्र मोदी यांचेही नाव आले आहे. मोदी यांच्या काळात गेल्या दशकभरात गुजरातने साधलेल्या विकासाची ‘टाईम’मध्ये खूप प्रशंसा करण्यात आली आहे. ‘‘ कसल्याही मूर्खपणाला स्थान न देणारे आणि निर्णयात ठामपणा असणारे मोदी यांचे नेतृत्व लाभल्यामुळे या देशाच्या विकासाचा वारू अडवणे कठीण आहे, कदाचित ते चीनलाही मागे टाकतील.’’ अशा शब्दात ‘टाईम’मध्ये कौतुक केले आहे. संपूर्ण जगावर प्रभाव टाकणाÚया 100 व्यक्तिंच्या ‘टाईम’च्या 2014 च्या सूची मध्ये नरेंद्र मोदी यांनाही स्थान मिळाले.
अमेरिकेतील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या ‘ब्रुकिंग्स इन्स्टिटयुशन’नेही गुजरातने दशकभरामध्ये केलेल्या प्रगतीचे कौतुक केले आहे. या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विल्यम अॅंथोलिस यांनी मोदींविषयी लिहिले आहे की, ‘‘ बुद्धिमान आणि आणि प्रभावी राजकीय नेता, तो जे काही शिकवतो, बोलतो तेच करतो.’’ गुजरातबद्दल त्यांनी पुढे लिहिले आहे की, ‘‘ जगाच्या पाठीवर, अगदी चीनसह इतक्या वेगाने कोठेही प्रगती झाली नसेल’’.
गुजरातमध्ये किती वेगाने विकास कामे झाली, याविषयी ‘फायनान्शियल टाईम्स’ या वृत्तपत्रामध्ये स्तुती करणारा लेख प्रसिद्ध झाला, त्याचे शीर्षक होते,‘‘ मोदी पुटस् गुजरात ग्रोथ ऑन ए फास्ट ट्रॅक’ गेल्या दशकभरा मध्ये गुजरातमध्ये शांतता नांदतेय आणि या राज्याने सगळ्या क्षेत्रात प्रगती केली आहे. विशेषत: युवकांच्या स्वप्नांना सत्यात उतरवले आणि उद्याचा ‘व्हायब्रंट गुजरात’ घडवला! असेही या लेखात म्हटले आहे
जून 2013 मध्ये, लॅटीन अमेरिकेच्या आणि कॅरेबिअन देशांच्या नेत्यांसमवेत नरेंद्र मोदी
अमेरिकी राष्ट्रेही गुजरातची प्रगती पाहून खूप प्रभावित झाली. जुलै 2012मध्ये नरेंद्र मोदी यांनी लॅटीन अमेरिकेच्या आणि कॅरेबिअन देशांच्या उच्चस्तरीय शिष्ठमंडळाची भेट घेतली यामध्ये सात राजदूतही होते. यामध्ये ब्राझिल, मेक्सिको, पेरू आणि डॉमिनिक रिपब्लिकचा समावेश होता. या मंडळींनी गुजरातच्या विकासाविषयी फक्त स्तुतीच केली नाही, तर गुजरातच्या सहकार्याने आपल्या देशात नवनवीन प्रकल्प सुरू करण्याची तयारी दाखवली. व्यापार केंद्र सुरू करण्याची कल्पना त्यांनी यावेळी मांडली. गुजरातमध्ये लाकूड, टिंबर, संगमरवर यासंबधीचे उद्योग सुरू करण्याचे ठरवले.
‘गुजरात दिन’ साजरा करण्याचे औचित्य साधत, दि. 20 मे 2012 च्या सकाळी नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतल्या 12 शहरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या अनिवासी भारतीयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी गुजरातने कशा पद्धतीने, कोणकोणत्या क्षेत्रात किती प्रगती केली आहे, याची माहिती नेमक्या शब्दातील भाषणांतून दिली. विशेष म्हणजे मोदी यांचे हे भाषण उपग्रहामार्फत, दूरचित्रवाणी आणि इंटरनेटमार्फत लाखो लोकांपर्यंत पोहोचले. त्यामुळे तीन क्षेत्रात गुजरातमध्ये किती विकास घडला आहे, हे त्यांना समजले.
त्यावेळेपासून मोदी अनिवासी भारतीयांशी सातत्याने संवाद साधत आहेत. अलिकडेच त्यांनी ‘ प्रवासी भारतीय दिन 2014’ नवी दिल्लीत साजरा केला आणि अनिवासी भारतीयांशी संवाद साधला.
अमेरिकेच्या भारतातील राजदूत श्रीमती नॅन्सी पॉवेल दि. 13 फेब्रवारी 2014 रोजी गांधीनगरला नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. या दोघांमध्ये अनेक विषयांवर अगदी विस्तृतपणे चर्चा झाली.
परदेशी नेते, शिष्ठमंडळे यांच्या होणाऱ्या वारंवार भेटी, त्यांच्याशी केली जाणारी चर्चा हे पाहिल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशांत आणि देशांबाहेर किती लोकप्रियता मिळवली आहे, हे सहजच लक्षात येते. अगदी व्यावसायिक तसेच सामान्य माणसापासून ते जागतिक नेत्यांपर्यंत प्रत्येकाला नरेंद्र मोदी यांच्या बरोबर संबंध प्रस्थापित करावेसे वाटतात. त्यांनी ज्याप्रमाणे गुजरातमध्ये परिवर्तन घडवून राज्याचा कायाकल्प केला, त्यावरून गुजरात म्हणजे ‘ग्रोथ इंजिन ऑफ इंडिया’! असे मानले जात आहे