पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तंत्रज्ञानाच्या शक्तीवर दृढ विश्वास आहे. स्वत: तंत्रज्ञानाचे एक कुशल वापरकर्ता असणारे मोदी यांना तंत्रज्ञान सोपे, प्रभावी आणि स्वस्त तसेच वेग, सोपेपणा आणि सेवेचा उत्तम संगम आहे, असे वाटते. ते जलदगतीने काम करते, प्रक्रिया तसेच यंत्रणा सोपी करते आणि लोकांची सेवा करण्याचा तो एक उत्कृष्ट मार्ग आहे. दुर्बलांना सक्षम बनविण्यासाठी आणि प्रशासन अधिक पारदर्शक बनविण्यासाठी तंत्रज्ञान हे सर्वोत्तम साधन आहे, असा मोदी यांना ठाम विश्वास आहे.
मे 2014मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी सरकारी कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर प्रयत्नपूर्वक वाढवला. कामकाजात अद्ययात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी डिजिटल भारत हा सर्वसमावेश कार्यक्रम सुरू केला. तंत्रज्ञानावर आधरित बहुउद्देशीय आणि बहु-आयामी अशा प्रगती या व्यासपीठाचा अनोखा उपक्रम पंतप्रधानांनी सुरू केला, जेथे प्रकल्पांचे परीक्षण केले जाते आणि लोकांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी पंतप्रधान स्वत: प्रगतीच्या सत्रादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान स्वत: उपस्थित राहतात आणि विविध क्षेत्रांमधील प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतात. यामुळे अतिशय सकारात्मक बदल झाला आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील जनतेला अधिक चांगल्या आरोग्य आणि शिक्षणसंबंधी सुविधा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. कोट्यवधी भारतीय शेतकऱ्यांना लघुसंदेशाच्या माध्यमातून कृषी विषयक माहिती प्राप्त होत आहे. कृषी-तंत्रज्ञान पायाभूत सुविधा निधीच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजाराला प्रोत्साहन देणारी योजना मंत्रिमंडळाने मंजूर केली आहे. भारतातील नियामक बाजारपेठा सामाईक ई-मंचावर एकत्र आणल्या जातील. त्यांमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना पारदर्शक पद्धतीने चांगल्या दरांमध्ये शेती उत्पादनांच्या खरेदी आणि विक्रीसाठी संधी मिळू शकेल.
जुलै 2014मध्ये पंतप्रधानांनी MyGov चा शुभारंभ केला. या पोर्टलद्वारे इंटरनेटचा वापर करत नागरिकांना प्रशासन आणि धोरण निर्मिती प्रक्रियेत सहभागी केले जाते. MyGov च्या माध्यमातून विविध मंत्रालये आणि विभाग आपल्या कामाशी संबंधित सूचना मागवतात. 'मन की बात' या आकाशवाणीवर दरमहा होणाऱ्याकार्यक्रमासाठी तसेच इतर वेळीही पंतप्रधानांनी MyGov चा उपयोग केला.
सप्टेंबर 2015मध्ये आपल्या अमेरिका भेटीदरम्यान पंतप्रधानांनी सिलिकॉन व्हॅलीला भेट दिली आणि तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक अग्रगण्य कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. ते फेसबुकच्या मुख्यालयात गेले, तेथे टाऊनहॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित प्रश्नोत्तर सत्रात ते सहभागी झाले. या सत्रादरम्यान त्यांनी विविध विषयांवर आधारित प्रश्नांची उत्तरेही दिली. गुगलच्या कार्यालयालाही त्यांनी भेट दिली आणि तेथे तांत्रिक नवकल्पनांवर आधारित काम जाणून घेतले. डिजिटल इंडियाभोजन समारंभात तंत्रज्ञान विश्वातील अग्रगण्य दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांनी डिजिटल भारताबाबत केंद्र सरकारचा दृष्टीकोन विशद केला. सत्या नाडेलापासून सुंदर पिचईपर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतात डिजीटल सक्षम समाजाची निर्मिती करण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदींनी तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर करणाऱ्या स्टार्ट अप नव उद्योजकांचीही भेट घेतली. एलोन मस्क यांनी त्यांना टेस्ला मोटर्सची सफर घडवली. विशेषतः ग्रामीण भागात आणि कृषी क्षेत्रातील विकासात तंत्रज्ञान कशा प्रकारे हातभार लावू शकेल, याबाबत नरेंद्र मोदी आणि मस्क यांनी चर्चा केली.
पंतप्रधानांनी परदेशी दौऱ्यात प्रत्येक वेळी तांत्रिक सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. भारत-आफ्रिका शिखर संमेलनादरम्यान तंत्रज्ञान क्षेत्रात आफ्रिकेला भारत मदत करू शकेल, असे मार्ग पंतप्रधानानी सूचीबद्ध केले.
अगदी वैयक्तिक आयुष्यातही मोदींचे जे परिचित आहेत, ते मोदींच्या तंत्रज्ञानाबाबतच्या आवडीबद्दल सुपरिचित आहेत. फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन आणि इन्स्टाग्रॅम अशा सोशल मिडिया व्यासपीठांवर डिजीटल उपस्थिती लावणाऱ्या जगातील सर्वात सक्रिय नेत्यांपैकी ते एक आहेत. लोकांमध्ये मिसळण्यासाठी आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी त्यांनी सोशल मिडियाचा वापर केला. लोकांना आपल्या मुलीसोबतचे सेल्फी शेअर करायला सांगून किंवा अतुल्य भारत मोहिमेअंतर्गत टिपलेले क्षण शेअर करायला सांगून एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी सोशल मिडियाचा वापर केला.
एम प्रशासन किंवा मोबाइल प्रशासनावरही मोदी भर देत आहेत. त्यांचे स्वत:चे नरेंद्र मोदी अँप असून ते ॲपल आणि ॲड्राइड फोनमध्ये उपलब्ध आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही ताज्या बातम्या, घडामोडी जाणून घेऊ शकता, पंतप्रधानांशी जोडले जाऊ शकता
अशा प्रकारे मोदी एका अशा भारताची निर्मिती करण्यासाठी अथक आणि निर्धाराने प्रयत्न करीत आहेत, जेथे 1.25अब्ज भारतीय तंत्रज्ञानाने जोडले गेले आहेत आणि तंत्रज्ञानाधारित नाविन्याचा वापर करण्यात व्यग्र आहेत. भारताला डिजिटल महामार्गाने जोडण्यासाठी आणि नेटिझन्सना सक्षम नागरिक करण्यासाठी ते काम करीत आहेत.