Quoteजे देश आपल्या मुळांशी जोडलेले असतात ते देश विकास आणि राष्ट्र उभारणीत पुढे वाटचाल करतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अंदमान आणि निकोबारमधील बेटांना आपल्या शूर वीरांचे नाव देणे हा त्यांनी देश सेवेसाठी केलेल्या कार्याचे भावी पिढ्यांना स्मरण होत राहील याची सुनिश्चिती करण्याचा एक मार्ग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  जे देश आपल्या मुळांशी जोडलेले असतात ते देश  विकास आणि राष्ट्र उभारणीत पुढे वाटचाल करतात असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यवावर शिव अरूर यांनी केलेल्या पोस्टवर आपला प्रतिसाद नोंदवला आहे.

एक्स या समाजमाध्यवावर शिव अरूर यांनी केलेल्या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी नोंदवलेला प्रतिसाद :

अंदमान - निकोबारमधील बेटांना आपल्या शूरवीरांचे नाव देणे म्हणजे त्यांनी देश सेवेप्रती केलेल्या कार्याचे भावी पिढ्यांना स्मरण होत राहील याची सुनिश्चिती करण्याचा एक मार्ग आहे. आपल्या देशावर अमिट ठसा उमटवलेले देशाचे स्वातंत्र्यसैनिक आणि महान व्यक्तिमत्वांच्या स्मृतींचे जतन करणे आणि त्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याच्या आमच्या मोठ्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे.

अखेरीस जे देश आपल्या मुळाशी जोडलेले असतात, असेच देश विकास आणि राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत पुढे वाटचाल करत राहतात.

या नामकरण समारंभातील माझेही भाषण या दुव्यावर उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=-8WT0FHaSdU

यासोबतच, अंदमान आणि निकोबार बेटांना भेट देण्याच्या अनुभवाचा आनंद घ्या. सेल्युलर कारागृहाला देखील भेट द्या आणि महान वीर सावरकर यांनी दाखवलेल्या धाडसाने प्रेरित व्हा.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'Operation Brahma': First Responder India Ships Medicines, Food To Earthquake-Hit Myanmar

Media Coverage

'Operation Brahma': First Responder India Ships Medicines, Food To Earthquake-Hit Myanmar
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 मार्च 2025
March 29, 2025

Citizens Appreciate Promises Kept: PM Modi’s Blueprint for Progress