पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत विकसित भारत संकल्प यात्रेच्या (VBSY) लाभार्थींशी संवाद साधला. लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थींपर्यंत वेळेत पोहोचेल, याची खात्री करून सरकारच्या प्रमुख योजनांच्या उद्देशाची परिपूर्णता करण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात येत आहे.
कर्नाटकातील तुमकुर येथील गृहोपयोगी वस्तूंचे दुकान मालक आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे (VBSY) लाभार्थी मुकेश यांनी संवाद साधताना पंतप्रधानांना सांगितले की त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 4.5 लाख रुपयांचे, पीएम मुद्रा योजनेचे कर्ज मिळाले असून ते सध्या या दुकानात 3 लोकांना रोजगार देत आहेत. मुकेश हे नोकरी शोधणार्या व्यक्तीपासून नोकरी प्रदाता बनले आहेत, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांनी कर्ज उपलब्धतेच्या सुलभतेबद्दल विचारणा केली.
मुकेश यांनी, त्यांना मुद्रा कर्ज आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार बँकांकडून मिळणाऱ्या कर्ज प्रक्रिया सुलभतेबद्दल माहिती देणाऱ्या एका प्रसारमाध्यम पोस्टबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी मुकेश यांना आजच्या 50 टक्के डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत, सर्व व्यवहार पूर्णपणे यूपीआय आणि डिजिटल पेमेंटमार्फत स्वीकारण्याची सूचना केली, कारण यामुळे बँकेकडून आणखी गुंतवणूक करण्यात मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की मुकेश हे भारतातील युवा वर्गाच्या लवचिकतेचे आणि दृढनिश्चयाचे उदाहरण आहेत, ज्यांना केवळ नोकऱ्यांचीच इच्छा नाही तर रोजगार निर्मितीचीही इच्छा आहे. देशातील तरुणांना पाठिंबा देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.