मोरोक्कोचे उद्योग, गुंतवणूक, व्यापार आणि डिजिटल अर्थव्यवस्था मंत्रालयातील परराष्ट्र व्यापार सचिव रकिया एडरहॅम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
रकिया एडरहॅम यांनी मारोक्कोच्या राजांच्या शुभेच्छा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या. पंतप्रधानांनी मोरोक्कोच्या राजांबरोबरच्या भेटीची आठवण सांगितली आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच मोरोक्कोच्या जनतेला शांतता आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही वर्षात विशेषत: कायदेशीर सहाय्य, सायबर सुरक्षा आणि अंतराळ क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यातील उल्लेखनीय प्रगतीचा रकिया एडरहॅम यांनी उल्लेख केला. उभय देशांमधील मजबूत संबंधांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि परस्पर हिताच्या क्षेत्रात तसेच गुजरातबरोबर मोरोक्कोचे व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नाचे स्वागत केले.