अफगाणिस्तानचे पराष्ट्र व्यवहार मंत्री सलाहुद्दिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.
भारताचे अफगाणिस्तानशी दृढ संबंध असल्याचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला. अफगाणिस्तान आणि तेथील नागरिकांवर लादलेल्या दहशतवादाविरोधातील लढयाला भारताचा ठाम पाठिंबा असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. शांततापूर्ण, एकात्मिक लोकशाही प्रदान आणि समृध्द देश उभारण्याच्या प्रयत्नांमध्ये अफगाणिस्तान आणि तेथील नागरिकांना मानवतेच्या आणि विकासात्मक पातळीवर भारत पूर्ण सहाय्य करेल याचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
परराष्ट्र व्यवहार मंत्री रबानी यांनी पंतप्रधानांना अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत माहिती दिली. अफगाणमधील शांती प्रक्रिया ही अफगाणच्या नेतृत्वाखाली, अफगाणच्या स्वायत्ततेने आणि अफगाणच्या नियंत्रणाखालीच राबविली जावी याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
भारत-अफगाणिस्तान धोरणात्मक भागिदारी परिषदेच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रबानी भारतात आले असून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांसह ते या परिषदेचे अध्यक्षपद भूषवतील.