सिंगापूरचे मंत्री गोह चोक तोंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
आपल्या दीर्घकालीन संबंधांच्या स्मृतींना उजाळा देत पंतप्रधानांनी गोह चोक तोंग यांचे स्वागत केले आणि यावर्षीच्या सुरुवातीला ली कॉन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले.
गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि सिंगापूर यांच्यातील उच्च स्तरीय भेटीदरम्यान झालेल्या आदान-प्रदानामुळे द्विपक्षीय संबंधांना चालना मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. व्यापार आणि गुंतवणूक, जोडणी तसेच सुरक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नाचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
भारत-आसियान नातेसंबंधांच्या मजबूत पायावर आधारित भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणात सिंगापूरचे महत्व विशेष असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आसियानशी भारताशी असलेल्या दृढ संबंधांचे श्रेय पंतप्रधानांनी गोह चोक तोंग यांना दिले.
दोन्ही नेत्यांनी परस्पर स्वारस्याच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांबाबतही चर्चा केली.